Prakash Amte News: जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांंना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती नीट होती. मात्र आज त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे. पाच दिवस झाले प्रकाश आमटेंचं इन्फेक्शन वाढलं आहे. त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहे.त्यामुळे त्यांना आराम करायची संधी द्या आणि भेटायला येऊ नका, असं आवाहन अनिकेत यांनी केले आहे.


फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलंय?


"बाबांना काल परत admit केले आहे. आता सर्व visitors ना पूर्ण प्रवेश बंद केलाय डॉक्टरांनी. बाबांच्या फोन वर कॉल करू नये. ताप अजून आहे. गेली 5 दिवस झाले पुन्हा इन्फेक्शन झाले आहे आणि high fever आहे. आज काही टेस्ट होतील. त्याचे रिपोर्ट २-३ दिवसांनी येतील. जे काही असेल अपडेट ते सोशल मीडिया वर टाकत जाईन. कृपया फोन करून तब्येत विचारू नका. कृपया त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पण कॉल करून त्रास देऊ नये. योग्य उपचार सुरू आहेत. माझ्या व्हॉट्सअप मेसेज वर कधीतरी चौकशी करू शकता. मोबाईलवर पर्सनल मेसेज करून विचारपूस करावी ही विनंती. लगेच उत्तराची अपेक्षा करू नये. आपले प्रेम आणि काळजी आम्ही समजू शकतो पण या टेन्शन मध्ये आणि बिझी असल्याने उत्तर लगेच मिळेल ही अपेक्षा करू नये. समजून घ्याल ही अपेक्षा. Dinanath Mangeshkar Hospital Pune येथे येऊन गेले असल्यास खाली रजिस्टर ठेवले आहे त्यावर आपण शुभेच्छा संदेश, नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा. भेटीची अपेक्षा आणि आग्रह मुळीच करू नये. बरे झाल्यावर नक्की भेटायला यावे हेमलकसाला.", अशी पोस्ट करत त्यांनी प्रकाश आमटेंच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.


जंगली प्राणी आणि माणूस यांच्यात वेगळं नातं जपणारं ठिकाण म्हणून त्यांचं 'आमटे आर्क' प्रसिद्ध आहे. सामाजिक कार्यासाठी ‘रेमन मॅगसेसे’ (Ramon Magsaysay) हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे  यांना देण्यात आला आहे. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय तर ठरतेच पण आबालवृद्धांना प्रेरणाही देते.