Covid 19 : या उन्हाळ्यात कोविड-19 (Covid19) रुग्णसंख्येत झालेल्या संभाव्य वाढीच्या चिंतेने काही तज्ज्ञांनी पुन्हा मास्क लावण्याचा इशारा दिला आहे, ते म्हणतात की, इनडोअर- आऊटडोअर मास्क-परिधान करण्याची वेळ परत आली आहे. चिकित्सक चक वुर्स्टर यांच्या म्हणण्यानुसार, देशभरातील सार्वजनिक-आरोग्य अधिकाऱ्यांनी हा इशारा दिला आहे. गेल्या महिनाभरात, अमेरिका, इस्रायल, पोर्तुगाल, फ्रान्स आणि इटलीसारख्या देशांमध्ये कोविड-19 रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आणि आणखी संसर्गजन्य Omicron subvariants, विशेषत: BA.4 आणि BA.5 - जे रोगप्रतिकारक संरक्षण टाळण्यास सक्षम असल्याचे दिसून येत आहे. अशातच तज्ज्ञांनी इशारा दिलाय की, कॅनडाला देखील येत्या काही महिन्यांत आणखी एक लाट येण्याची शक्यता आहे.
कोरोनाची संभाव्य लाट रोखण्याचा एक त्वरित मार्ग, तज्ज्ञ म्हणतात...
सध्या, कॅनडामध्ये हवाई आणि रेल्वे प्रवाशांसाठी मास्क आवश्यक आहेत, काही डॉक्टरांच्या मते, त्यांना घरातील सार्वजनिक ठिकाणी पुन्हा अनिवार्य करणे हा आणखी एक संभाव्य वाढ रोखण्याचा एक त्वरित मार्ग आहे. डॉ. वुर्स्टर म्हणाले, “पुन्हा इनडोअर मास्क लावणे आवश्यक आहे,” उन्हाळ्याच्या दरम्यान कोविड-19 रूग्णांची वाढ त्यांनी आपत्कालीन विभागात पाहिला आहे, “अशा परिस्थितीत मास्क ही नेहमीच पहिली गोष्ट असली पाहिजे, तसेच त्याला प्राधान्य दिले पाहिजे."
सार्वजनिक-आरोग्य आदेशांना कंटाळले नागरिक
टोरंटोचे आपत्कालीन चिकित्सक काशिफ पिरजादा म्हणाले, “यूएस आणि युरोपमध्ये घडत असलेल्या ट्रेंडपासून आपण का धडा घेत नाही, हे मला समजत नाही. डॉ. पीरजादा म्हणाले की, त्यांना समजलंय, लोक सार्वजनिक-आरोग्य आदेशांना कंटाळले आहेत, त्यामुळे सर्वत्र किंवा कायमचे मास्क घालणे आवश्यक नाही. किराणा दुकाने, सार्वजनिक वाहतुकीवर, वैद्यकीय दवाखाने आणि कोठेही असुरक्षित असलेल्या लोकांना जाण्याशिवाय पर्याय नाही अशा ठिकाणी मास्कची आवश्यकता असावी असे त्यांचे मत आहे.
कोविड-19 रुग्णसंख्या पुरेशी कमी झालेली नाही
सार्वजनिक आरोग्यामध्ये पदव्युत्तर पदवी असलेले बालरोगतज्ञ तहसीन लढा यांनी देखील कोविड-19 रुग्णसंख्या पुरेशी कमी झालेली नसल्यामुळे मास्क अनिवार्यतेबद्दल सांगितले आहे. 18 जून पर्यंत, कॅनडामध्ये COVID-19 ची 15,047 नवीन रुग्णसंख्या आढळली. जानेवारीमध्ये ओमिक्रॉन वेव्हच्या पार्श्वभूमीवर दर आठवड्याला 288,771 रुग्णसंख्या असताना, नवीन रुग्ण संख्या नोव्हेंबरमध्ये कमी होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 3957 नव्या रुग्णांची नोंद तर 3696 रुग्ण कोरोनामुक्त
- Mumbai Corona Update : मुंबईत बुधवारी 1504 रुग्णांची नोंद, 1645 कोरोनामुक्त
- Aurangabad: दिवसभरात 42 रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली; चौथ्या लाटेची भीती