नाशिक: शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांचं स्वप्न सत्यात उतरण्याची चिन्हं आहेत. कारण त्यांना सोडून गेलेले शिष्य पुन्हा एकत्र आले आहेत.


शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची नवी सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये 21 जणांची नावं आहेत. यामध्ये शरद जोशींच्या शिष्यांचा समावेश आहे. शेती अर्थतज्ज्ञ गिरधर पाटील यांनी याबाबतची माहिती एबीपी माझाला दिली.

त्यामुळे आंदोलनाच्या ठिणगीच्या निमित्तानं, शेतकरी नेते एकत्र येऊन, शरद जोशींचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवत असल्याचे संकेत आहेत.

यावेळी गिरधर पाटील म्हणाले, "शेतकरी आंदोलनाची फेरआखणी होणार आहे. राजकीय पक्षांना दूर केल्याने हिंसात्मक आंदोलन थांबलं आणि अहिंसात्मक प्रभावी आंदोलन सुरू झालं आहे. राज्यभरातल्या नव्या सदस्यांसह सुकाणू समिती स्थापन झाली आहे.
अजून सदस्य वाढणार आहेत. यामध्ये रघुनाथदादा पाटील, अजित नवले, डॉ. गिरीधर पाटील, अनिल धनवट, हंसराज वडघुले यांच्यासह शेतकरी संघटनेचे नेते सुकाणूचे सदस्य असतील".

शेतकरी आंदोलनासाठी 21 जणांची नवी सुकाणू समिती

  1. राजू शेट्टी

  2. अजित नवले

  3. रघुनाथदादा पाटील

  4. संतोष वाडेकर

  5. संजय पाटील

  6. बच्चू कडू, प्रहार

  7. विजय जवंधिया

  8. राजू देसले

  9. गणेश काका जगताप

  10. चंद्रकांत बनकर

  11. एकनाथ बनकर

  12. शिवाजी नाना नानखिले

  13. डॉ.बुधाजीराव मुळीक

  14. डॉ. गिरीधर पाटील

  15. गणेश कदम

  16. करण गायकर

  17. हंसराज वडघुले

  18. अनिल धनवट