बैठकीला उपस्थितीत राहण्यास कुणा-कुणाचा नकार?
- डॉ. गिरधर पाटील
- अनिल घनवट
- रामचंद्रबापू पाटील
- डॉ. बुधाजीराव मुळीक
समितीवर आक्षेप काय?
सुकाणू समितीतले काही ठराविक लोक परस्पर निर्णय घेतात. तसंच सरकारशी चर्चेची ही योग्य वेळ नाही. शेतकरी आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, मगच चर्चा, असा पहिला ठराव होता.”, असे म्हणत सुकाणू समितीतल्या काही जणांनी आक्षेप घेतला आहे.
डॉ. गिरधर पाटील काय म्हणाले?
“आजच्या सुकाणू समितीच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. किंबहुना, आजच्या बैठकीचं निमंत्रणही दिलं गेलं नाही. पहिल्या बैठकीचीही माहिती सर्वांपर्यंत गेली नाही. मुळात सुकाणू समिती नेमल्याचीही माहिती नव्हती.”, असे डॉ. गिरधर पाटील म्हणाले.
समितीत राजकीय थिल्लरपणा : डॉ. गिरधर पाटील
सुकाणू समितीत राजकीय थिल्लरपणा सुरु असून, समितीने आम्हाला अंधारात ठेवून निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप समितीचे सदस्य डॉ. गिरधर पाटील यांनी केला आहे.
सुकाणू समितीचे निमंत्रक राजू देसलेंकडून आरोपांना उत्तर
डॉ. गिरधर पाटील खोट बोलत आहेत. आजच्या बैठकीसाठी आम्ही सगळ्यांना स्वतः फोन केले आहेत, निमंत्रण दिलं आहे असं सांगत सुकाणू समितीचे निमंत्रक राजू देसले यांनी गिरधर पाटलांवर पलटवार केला आहे.
सुकाणू समितीत कोण कोण आहे?
- राजू शेट्टी
- अजित नवले
- रघुनाथदादा पाटील
- संतोष वाडेकर
- संजय पाटील
- बच्चू कडू, प्रहार
- विजय जवंधिया
- राजू देसले
- गणेश काका जगताप
- चंद्रकांत बनकर
- एकनाथ बनकर
- शिवाजी नाना नानखिले
- डॉ.बुधाजीराव मुळीक
- डॉ. गिरीधर पाटील
- गणेश कदम
- करण गायकर
- हंसराज वडघुले
- अनिल धनवट