नागपूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन केवासी (Online KYC) करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवून 31 जुलै 2022 अखेरपर्यंत केवासी पूर्ण करण्याबाबत केंद्र शासनाने मुदत वाढ दिलेली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना याप्रमाणे ऑनालाईन केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी http://pmkisan.gov.on या संकेतस्थळावरील फार्मर कॉर्नर या टॅब मध्ये किंवा पीएम किसान ॲपद्वारे (PM Kisan App)ओटीपीद्वारे लाभार्थीना स्वत: ऑनलाईन केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. तसेच ग्राहक सेवा केंद्रावर ऑनलाईन प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल.
केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर 15 रुपये फक्त निश्चित करण्यात आला आहे. PM Kisaan योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी ऑनलाईन केवासी प्रमाणीकरण्याची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून 31 जुलै 2022 अखेरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांनी ती पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी कळविले आहे.
Farmers Competition : शेतकऱ्यांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा, लाखोंचे बक्षिस जिंकण्याची संधी
School Development : शाळांच्या पायाभूत सोयीसुविधासाठी अनुदान हवा?
नागपूर : शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून नागपूर जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा,दिव्यांगांच्या शाळा, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना चालु वर्षांत योजनांतर्गत शाळांना पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान देण्यात येते. याअंतर्गत प्रस्ताव मागविले आहेत. इच्छुक शाळांच्या संस्थाचालकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय (गृह शाखा) येथे सादर करावेत, असे सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांनी कळविले आहे.