Ravindra Jadeja: भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघाच्या चिंता वाढवणारी माहिती समोर आलीय. मीडिया रिपोर्टनुसार, भारताचा उप कर्णधार रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) स्नायूंच्या ताणामुळं वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला एकदिवसीय मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. मात्र, भारतीय क्रिकेट बोर्ड किंवा संघ व्यवस्थापनानं याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.


वेस्ट इंडीजविरुद्ध भारताच्या वरीष्ठ खेळाडूंना विश्रांती
वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, विकेटकिपर ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आलीय.


शिखर धवनच्या खांद्यावर भारतीय संघाची जबाबदारी
वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवन भारताचं नेतृत्व करणार आहे. तर, रवींद्र जाडेजाकडं उपकर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. रवींद्र जाडेजा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यानं गोलंदाजीसह फलंदाजीतही दमदार प्रदर्शन केलंय. यातच रवींद्र जाडेजाचं संघातून बाहेर पडणं भारतासाठी मोठा धक्का असेल.


रवींद्र जाडेजाच्या खेळण्यावर संभ्रम
रवींद्र जाडेजा आजच्या सामन्यात खेळणार की नाही? हे नाणेफेक दरम्यान स्पष्ट होईल. सध्या बीसीसीआयचे वैद्यकीय टीम जाडेजाच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. आजच्या सामन्यात रवींद्र जाडेजा न खेळल्यास त्याच्या ऐवजी अक्षर पटेलला संघात जागा देण्यात येईल.


हे देखील वाचा-