मुंबई : राज्य सरकारने 22 एप्रिलपर्यंत नोंद केलेल्या तुरीचीच खरेदी केली जाईल, असा निर्णय घेतला. मात्र ही मुदत 31 मे पर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे.

सहकार विभागाने याबाबतचं पत्र केंद्र सरकारला लिहिलं आहे. याशिवाय आत्तापर्यंत खरेदी झालेल्या तुरीचं टेंडर काढण्याचाही विचार राज्य सरकारचा आहे.

22 एप्रिलपर्यंत नोदवण्यात आलेल्या तुरीची सरकार खरेदी करणार असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यासाठीच्या अटींमध्येही वारंवार बदल करण्यात आले, शिवाय या तूर खरेदीत व्यपाऱ्यांनीही घोटाळे करून आपली तूर खेरदी केल्याचं समोर आलं होतं.

या सगळ्यात शेतकरी मात्र हवालदिल झाला होता. त्यामुळे जर केंद्र सरकारने 31 मेपर्यंत तूर खरेदीची मुदतवाढ करून दिली तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.