Eknath Shinde Devendra Fadnavis मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नाराजी कायम असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रालयात बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली. याशिवाय नगरविकास आणि पाणी पुरवठा मंत्रालयाच्या नियोजित बैठकाही त्यांनी रद्द केल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीमागील नेमकं कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यात आज (4 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागलंय. गेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही एकनाथ शिंदेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच हजेरी लावली होती. त्यामुळे आज प्रत्यक्षात एकनाथ शिंदे मंत्रालयात उपस्थित राहणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

आमची आणखी जबाबदारी वाढली- एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात महिलांच्या हळदीकुंकूच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी लाडके बहीण जास्त आहेत लाडके भाऊ ची संख्या कमी आहे. कार्यक्रमाच्या शुभेच्छा द्यायला आलो आहे. या अडीच वर्षात सगळ्यांचा मनातलं सरकार आपण आणलं. अनेक रखडलेले प्रकल्प विकासाचे प्रकल्प सुरू केले. अनेक योजना देखील आपण सुरू केल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि अनेक योजना यशस्वी झाली. एसटीम प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत लाडक्या बहिणींना दिली, असं एकनाथ शिंदे म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही एवढा मोठा विजय मिळवून दिला. सगळ्याच विरोधकांचा डिपॉझिट जप्त झालं, चारी मुंड्या चीत झाले. महायुती सरकार बहुमताने निवडून आलं. आमची आणखी जबाबदारी वाढली आहे. विरोधक काही म्हणत असेल तर लाडकी बहीण योजना कधी बंद होऊ देणार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो..बाळासाहेब, आनंद दिघे साहेब यांनी काय शिकवलं आहे. जो शब्द द्याल तो एक वेळा नाही.दहा वेळा नाही. शंभर वेळा विचार करून द्या. एकदा शब्द दिला तर मागे फिरायचं नाही हे काम आनंद दिघे , बाळासाहेबांची शिकवण आहे. त्यांचा विचार आणि आम्ही राज्य पुढे चालवलं, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले. 

तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गृहनिर्माण विभाग देखील आपल्याकडे- एकनाथ शिंदे

तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गृहनिर्माण विभाग देखील आपल्याकडे आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आता खाली आणि वर राहणाऱ्या लोकांना घर मिळणार. जे लोक राहतात त्या लोकांना घर देण्याच निर्णय आपण घेतला. क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी तुमचा लाडका भावाने वीस वर्ष संघर्ष केला. क्लस्टर डेव्हलपमेंट योजना जगात नाही. ती देखील आपण महाराष्ट्र मध्ये आणली आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यांना घर देणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता नारळ फोडायचं आणि भूमिपूजन करायचं बाकी आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. सर्वांना घर मिळणार मुंबई ठाण्यामध्ये सर्वांना घर मिळणार...घर बांधायचा असेल तर नगर विकास विभाग माझ्याकडे आहे. कोणालाही अडथळा निर्माण करता येणार नाही, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले.

संबंधित बातमी:

Jaya Bachchan On Mahakumbhmela 2025: महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेहांना नदीत फेकलं, त्यामुळे पाणी प्रदुषित; जया बच्चन यांच्या दाव्यानं खळबळ