Hingoli : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पूर्ण केले. राम मंदिरासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रित केले. परंतु त्यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला, अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने आघाडी केली. आम्ही फेसबुक लाईव्हने नाही तर लोकांकडे जाऊन त्यांचे काम करत आहोत. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना ताटकळत ठेवले. आज वर्षा बंगला सर्वांसाठी खुला आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. हिंगोलीतील शिवसंकल्प अभियान सभा पार पडली. या वेळी ते बोलत होते. 


एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला देखील न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहोत. काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला बळी पडायचे नाही. लोकांच्या सुख-दु:खात धावून जाणारा मुख्यमंत्री आहे. मला काय मिळेल यापेक्षा राज्याला काय मिळेल, याचा मी जास्त विचार केला. धनुष्यबाण आपल्या सोबत आहे. बाळासाहेबांचा विचार आपल्या सोबत आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले. 


ठाकरेंनी शिवसैनिकांना ताठकळत ठेवले; एकनाथ शिंदेंची टीका 


उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना ताठकळत ठेवले. आज वर्षा बंगला सर्वांसाठी खुला आहे. या राज्यात सध्या विकासाला चालना मिळत आहे. गेल्या अडिच वर्षांपूर्वी राज्याला मागे नेण्याचे काम सुरु होते. हा एकनाथ शिंदे आयुष्यातील प्रत्येक क्षण महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च करणार आहे. मी घरात बसून उंटावरुन शेळ्या राखणारा नेता नाही, असा टोलाही शिंदेंनी ठाकरेंना लगावला.
 


सामान्य कार्यकर्ता म्हणून आज काम करतोय : एकनाथ शिंदे 


मी सामान्य कार्यकर्ता म्हणून आज काम करत आहे. माझ्या राज्यातील नागरिकांवरचे संकट मला दूर करायचे आहे. मला फक्त प्रेम  कमवायचय. हेलीकॉप्टरने शेती करतो म्हणून टीका केली जाते. हेलीकॉप्टरने जाऊन शेती करणे चांगलेच आहे. माझी नाळ शेतीशी जुळलेली आहे. मी  नेहमी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आपली भूमिका बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांची भूमिका आहे. आपला सर्वांचा संकल्प म्हणजे राज्याचा सर्वांगीण विकास हाच आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही सर्व नियम बाजूला ठेवतो. आम्ही आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार देतोय. माताभगिनींसाठी एसटीचे तिकीट निम्मे केले. ज्येष्ठांना देखील मोफत प्रवास सुरु केला, असेही शिंदे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Shiv Sena Maharahtra MLA Disqualification Case Verdict LIVE Updates : थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्षांकडून निकाल वाचनास सुरुवात, निकालाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर