Abhishek Pathak And Shivalika Oberoi Becoming Parents: 'दृश्यम 2' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि त्यांची पत्नी शिवालिका ओबेरॉय यांच्या घरात लवकरच नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. लग्नाच्या दोन वर्षांनंतर या जोडप्याने शुक्रवारी पोस्टद्वारे आनंदाची बातमी शेअर केली आहे. इन्स्टाग्राममध्ये शेअर केलेल्या या पोस्टमध्ये दोघांनी पालक होणार असल्याची घोषणा केलीये. सध्या ही पोस्ट सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. चाहते तसेच सेलिब्रिटींनी या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी अभिषेक आणि शिवालिका यांनी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी लवकरच पालक होणार असल्याचं जाहीर केलं. या पोस्टमध्ये कपल फोटो आहे. या फोटोमध्ये शिवालिकाने लाल रंगाचे आउटफिट कॅरी केलं आहे. तसेच तिच्या हातात लहान मुलाचे मोजे आहेत. तर काळ्या रंगाचा शर्ट घातलेला अभिषेक शिवालिकाला ख्रिसमस ट्रीसमोर मिठी मारताना दिसत आहे.
तर, दुसऱ्या फोटोमध्ये, हे जोडपे ख्रिसमस ट्रीवर एक टॅग धरून आहे. ज्यावर लिहिले आहे की, "बेबी पाठक 2026 मध्ये येत आहे." या दुसऱ्या फोटोमध्ये दोघांचे चेहरे दिसत नाहीयेत. आनंदाची बातमी शेअर करताना या जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आमच्या प्रेमकथेला सर्वात गोड अध्याय मिळाला आहे. एक छोटासा आशीर्वाद आमच्या आयुष्यात सामील होत आहे..."
ही पोस्ट शेअर होताच या जोडप्यावर कमेंटद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते तसेच सेलिब्रिटींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
दोघांच्या प्रेम कहाणीची सुरूवात कशी झाली?
अभिषेक आणि शिवालिकाची पहिली भेट खुदा हाफिज या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. अभिषेक निर्मित आणि शिवालिकाने अभिनय केलेला हा चित्रपट 2020 साली प्रदर्शित झाला होता. एकत्र काम करत असताना, ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेकने तुर्कीमध्ये शिवालिकाला प्रपोज केलं होतं. फेब्रुवारी 2023 साल गोव्यात या जोडप्याने लग्नगाठ बांधली. दरम्यान, आता लग्नाच्या दोन वर्षांनंतर हे जोडपे पालक होणार आहे.
हे ही वाचा -