Who is Greg Biffle : अमेरिकेतून क्रीडा जगताला हादरवून टाकणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी 18 डिसेंबर रोजी अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यात एक बिझनेस जेट (Business Jet) टेकऑफदरम्यान भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानात असलेल्या सर्व 7 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात नॅसकार कंपनीचे निवृत्त दिग्गज ड्रायव्हर ग्रेग बिफल, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले यांचाही समावेश आहे. टेकऑफच्या वेळीच रन-वेवर विमानाला अचानक आग लागली. काही कळायच्या आतच आगीने विकराळ रूप धारण केल्याने बचावकार्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
ग्रेग बिफल कोण होते? (Who is Greg Biffle)
ग्रेग बिफल यांच्या निधनाने क्रीडा जगताला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर चाहते, सहकारी खेळाडू आणि अमेरिकेतील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 55 वर्षीय ग्रेग बिफल हे नॅसकार मधील नामवंत ड्रायव्हर होते आणि ते निवृत्त झाले होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 50 हून अधिक नॅसकार शर्यतीमध्ये विजय मिळवला होता. यामध्ये 19 कप सिरीज विजयांचा समावेश आहे. 2000 मध्ये ट्रक सिरीज चॅम्पियनशिप, तर 2002 मध्ये एक्सफिनिटी सिरीजचे विजेतेपद त्यांनी पटकावले होते.
विमानात संपूर्ण कुटुंब असल्याची पुष्टी
ग्रेग बिफल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी क्रिस्टीना, 5 वर्षांचा मुलगा राइडर आणि 14 वर्षांची मुलगी एम्मा विमानात होते. ही माहिती मोटरस्पोर्ट्स युट्यूबर गॅरेट मिशेल यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली. मिशेल यांनी लिहिले, “दुर्दैवाने मी ही बाब निश्चितपणे सांगू शकतो की ग्रेग बिफल, त्यांची पत्नी क्रिस्टीना, मुलगी एम्मा आणि मुलगा राइडर हे त्या विमानात होते. ते आमच्यासोबत दुपार घालवण्यासाठी येत होते. ही बातमी शेअर करताना मला अत्यंत दुःख होत आहे.”
विमानाला आग कशी लागली?
मिळालेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 6 मिनिटांनी Cessna C550 हे विमान फ्लोरिडाच्या दिशेने उड्डाणासाठी सज्ज झाले होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच तांत्रिक अडचण जाणवल्याने विमानाने पुन्हा विमानतळावर परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात विमान जमिनीवर आदळले, त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच आगीच्या भडका उडाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हे ही वाचा -