Dhule News : शहरातील वैभव अनिल सोनगिरे यांचा अवघा 6 महिन्यांचा मुलगा वेदांश सोनगिरे (Vedansh Sonar) या चिमुकल्याची चांगली स्मरणशक्ती पाहून त्याला कलाम वर्ल्ड रेकॉर्ड (Kalam World Record) जाहीर करण्यात आला आहे. त्याच्या स्मरणशक्तीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. वेदांशला मिळालेल्या अवॉर्डमुळे धुळ्याच्या (Dhule) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 


सध्याच्या काळात लहान मुलांना मोबाईलचे (Mobile) व्यसन लागत आहे. पुस्तकी अभ्यासपासून ते दूर होत असून याबाबत अनेक अभ्यासकांनी चिंता व्यक्त केला जात आहे. अशात धुळे शहरातील सोनार कुटुंबीयांनी आपल्या मुलाची स्मरणशक्ती (Memory) ओळखत त्याला विविध गोष्टींचे चित्र दाखऊन ते ओळखायला शिकवले आणि अवघ्या 6 महिन्यांच्या वेदांश सोनगिरेने एका वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याला कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे.  


काही क्षणातच वेदांशला शिकवलेलं राहतं लक्षात 


वेदांशचे आई आणि वडील यांना लक्षात आले की, वेदांशला एखादी गोष्ट दाखवली की ती गोष्ट सहज त्याच्या लक्षात राहते. त्यानंतर त्यांनी त्याला अनेक गोष्टी शिकवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे वेदांशने त्या सहजपणे आत्मसात केल्या. वेदांशच्या पालकांनी त्याला एबीसीडी, विविध मुळाक्षरे, 16 हून अधिक देशांचे राष्ट्रध्वज, प्राण्यांची नावे, फळे, फुलांची नावे, पक्षी, भाज्या विविध रंग, 1 ते 20 पर्यंत चे नंबर, महापुरुषांच्या माहिती हे सर्व त्याला सांगितले आणि वेदांश हे सर्व काही क्षणातच स्मरणात ठेवले. त्यामुळे पालकांना त्याचे खूप कुतूहल वाटले. टीव्ही आणि मोबाईलपासून मुलांना दूर ठेवल्यास त्यांच्या सुप्तगुणांचा माग घेता येईल, अशी आशा वेदांशच्या पालकांनी यावेळी व्यक्त केली.


...म्हणून होते कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद 


चांगली स्मरण शक्ती असलेल्या चिमुकल्या मुलांसाठी कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवार्ड दिला जातो, अशी माहिती वेदांशच्या पालकांना मिळाली. त्याबाबत त्यांनी माहिती घेऊन ऑनलाइन पद्धतीने त्यासाठी नामांकन भरले. त्यावेळी त्यांना वेदांशचे व्हिडिओ देण्याबाबत सांगण्यात आले. त्यांनी वेदांशला महापुरुषांचे फोटो, भाज्यांचे प्रकार, विविध देशांचे झेंडे ओळखतानाचे व्हिडिओ चित्रित करून पाठवले. वेदांशची तल्लख बुद्धी पाहता, त्याचे नामांकन स्वीकारत अवघ्या 6 महिन्यांच्या असलेल्या वेदांश सोनगिरे या चिमुकल्याची नोंद कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आल्याची माहिती त्याच्या आई वडिलांनी यावेळी दिली.


आणखी वाचा 


Dhule Loksabha : धुळ्यात काँग्रेस मोठ्या खेळीच्या तयारीत, सुभाष भामरेंविरोधात शोभा बच्छाव निवडणुकीच्या रिंगणात?