Dhule-Dadar special express train : रेल्वेने धुळेकरांना मोठं गिफ्ट दिलेय. धुळ्यासाठी विशेष दादर एक्स्प्रेस सुरु कऱण्यात आली आहे.  रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Patil Danve) यांनी आज या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. 29 एप्रिल रोजी धुळे रेल्वे स्थानकावरून धुळे - दादर विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या उद्घाटना सेवेला व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला.  भारती प्रविण पवार, डॉ. सुभाष भामरे, उन्मेष पाटील, प्रतिभा चौधरी, मंगेश चव्हाण, आमदार आणि इतर मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. 


तत्पूर्वी, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकनरेश लालवानी यांनी व्हिडिओ लिंकद्वारे मान्यवरांचे, माध्यमांचे आणि प्रवाशांचे स्वागत केले.  आलोक सिंग, अतिरिक्त महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई मुख्यालयातून व्हिडिओ लिंकद्वारे जुळले होते.  भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस एस केडिया; मुख्यालय व विभागातील वरिष्ठ अधिकारी धुळे स्थानकातून कार्यक्रमाला उपस्थित होते.






ट्रेन क्र. 01066/01065 ची नियमित सेवा. 
धुळे - दादर - धुळे विशेष एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक) दि. ३०.०४.२०२३ पासून सुरू होईल.


नव्या एक्स्प्रेसचे नेमके फायदे काय :
 
धुळे हे शुद्ध 'दूध आणि तूप' उत्पादन, जास्तीत जास्त लागवडीयोग्य जमीन आणि भुईमुगाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कृषी आधारित उद्योगांमध्ये आघाडीवर आहे. पवन ऊर्जा निर्मितीमध्ये धुळे अग्रेसर आहे.  ही ट्रेन धुळ्याला भारताच्या आर्थिक राजधानीशी जोडेल.


ही ट्रेन आर्थिक, परवडणारी आणि जलद वाहतूक मार्ग प्रदान करेल ज्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होईल.


शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना या ट्रेनचा खूप फायदा होईल. 
 
 01066/01065 धुळे - दादर - धुळे विशेष एक्स्प्रेसच्या नियमित सेवेच्या तपशीलवार वेळा:
 
01065 दि. ३०.४.२०२३ पासून दादर येथून दर रविवार, सोमवार आणि शुक्रवारी १६.१५ वाजता सुटेल आणि  धुळ्याला त्याच दिवशी २३.३५ वाजता पोहोचेल.


01066 दि. १.५.२०२३ पासून धुळे येथून दर सोमवार, मंगळवार आणि शनिवारी ०६.३० वाजता सुटेल आणि  त्याच दिवशी १३.१५ वाजता दादर येथे पोहोचेल.
   
 संरचना : एक वातानुकूलित चेअर कार, ८ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन.


 थांबे : शिरूड, जामधा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे.