धुळे : 'पंतप्रधान आता ग्रामपंचायतीचे सरपंच झाले की काय' असा सवाल करत प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi) टीकास्त्र सोडलं. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे गुरुवारी (26 ऑक्टोबर) रोजी आदिवासी एल्गार परिषद निमित्ताने धुळे (Dhule) जिल्हा दौऱ्यावर होते. एल्गार सभा सुरू होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच धारेवर धरले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  शिर्डी दौऱ्यावर आले असता या दौऱ्यानिमित्ताने प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना पंतप्रधआन नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.


प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?


प्रधानमंत्री आता ग्रामपंचायत सरपंच झाले म्हटल्यानंतर काय बोलणार असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका केली. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'गावात कुठेही काहीही झालं तर उद्घाटन माझ्या हातूनच व्हावे असे ज्याप्रमाणे सरपंचाला वाटतं तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील वाटू लागले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसून आता सरपंच झालेत, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.


भाजपमुळे हिंदूनी देश सोडला - प्रकाश आंबेडकर 


भाजप जे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेत आहे, त्यांच्याच काळात मागील एक वर्षात जवळपास 1 लाख 13 हजार हिंदूंनी देश सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं.  त्यातील एकाने आपलं मनोगत देखील व्यक्त केलंय.  भाजप हे आम्हाला आमच्या विचाराने चालू देत नसल्याचे म्हणत भाजप आम्हाला त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.  त्यामुळे आमच्या वाड वडिलांची इज्जत भाजप मातीमध्ये मिळवायला निघाली असल्याने आम्ही देश सोडत आहोत, असे म्हणत हिंदूच सरकार म्हणावणाऱ्या भाजपामुळे देशातील असंख्य हिंदू हे देश सोडत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.


'आम्ही लोकसभेच्या जागा लढवण्याच्या तयारीत'


सध्या राजकारण बघता पंतप्रधान मोदी यांचा काही भरोसा नाही, त्यामुळे आम्ही  महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 च्या 48 जागा लढवण्याच्या तयारीला लागलो आहोत. से म्हणत बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. 


मध्यप्रदेश मध्ये हे सर्व चित्र दिसायला लागल आहे. अखिलेश यादव आणि नितीश कुमार यांचा पक्ष वेगळा लढतोय. इंडिया आघाडी मधील घटक पक्ष हे राज्य पातळीवर एकमेकांशीच लढत असल्याने याची पुनरावृत्ती लोकसभेत होणार नाही याची काय श्वाशती आहे असा सवाल उपस्थित करत सध्या मध्यप्रदेशच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपतर्फे सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरून निशाणा साधला.


हेही वाचा : 


PM Narendra Modi : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल