Dhule, Ganesh Visarjan 2022 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा नामगजरात आज बाप्पाचं विसर्जन केलं जाईल. राज्यभरात आज दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. राज्यभरात गणपती विसर्जनच्या मिरवणुका सुरु आहेत. अशातच धुळ्यात विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याचा प्रकार समोर आला आहे. धुळ्यात गणेश विसर्जन दरम्यान एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राकेश आव्हाड असे तरुणाचे नाव आहे. धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात ही घटना घडली. गणपती विसर्जन दरम्यान राकेशचा पाय घसरून नदीत पडल्याने दुर्देवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. 


धुळे तालुक्यातील आनंद खेडेगावात राहणाऱ्या एका तरुणाचा गणेश विसर्जन दरम्यान बुडून मृत्यू झाल्याची घटकानायक घटना घडली असून यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण राज्यात आज गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना धुळे तालुक्यातील आनंद खेडे गावावर मात्र अशोक कळा पसरली आहे गावात राहणाऱ्या राकेश आवड या तरुणाचा विसर्जनादरम्यान पांझरा नदी पात्रात पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राकेश आपल्या मित्रांसोबत गणेश विसर्जनासाठी गेला असताना यावेळी तो नदीपात्रात उतरण्यास गेला मात्र त्याचा पाय घसरून तो नदीत पडला, यावेळी त्याला त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र नदीचे पात्र खोल असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे आनंद खेडे गावावर शोककळा पसरली आहे. 


तालुक्यातील आनंदखेडा येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश विसर्जनासाठी गेलेल्या इलेक्ट्रिक इंजिनियर असलेल्या तरुणाचा पांझरा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. राकेश अशोक आव्हाड (वय 29, रा आनंदखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आज दि. 9 रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घरचा गणपती विसर्जनसाठी कुटुंबीयांसह गाव शिवारातील पांझरा नदीवर गेला होतो. त्या दरम्यान या ठिकाणी फरशी असलेल्या वाळुवरुन पाय घसरल्याने राकेश हा पाण्यात पडला.
फरशीपुलाच्या खाली असलेल्या सिमेंट पाईपात वाहून गेल्याने पाईपातील पाण्यात बुडाला. त्यामुळे कुटुंबियांनी एकच आरडाओरड केली. सुमारे 15 मिनिटांनी पाईपाच्या दुसऱ्या बाजुकडुन राकेश हा बेशुद्ध अवस्थेत बाहेर निघाल्याने त्यास कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता तेथील डॉ.अरुणकुमार नागे यांनी तपासणी करून मृत घोषित केले.याबाबत रविकांत बापु सानप यांच्या माहितीवरून तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे