धुळे : धुळे (Dhule) शहरात सोमवार (20 नोव्हेंबर) रोजी आझाद समाज पार्टीच्या वतीने टिपू सुलतान (Tipu Sultan) यांची जयंती साजरी करण्यात येणार होती. मात्र पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत ही जयंती साजरी करण्यास बंदी घालण्यात आलीये. यावेळी आजच समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करित जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जयंती साजरी करण्यास मज्जाव केला. तसेच यावेळी प्रशासनाने टिपू सुलतान यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आलीये. 


टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसांपूर्वी आझाद समाज पार्टीच्या वतीने महानगरपालिकेच्या समोर बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर पोलीस पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासनाकडून हटवल्यानंतर टिपू सुलतान यांची साजरी करण्याचा निर्णय आझाद समाज पार्टीच्या वतीने घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर समोवारी शहरातील पत्रकार भवन येथे टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात येणार होती. पण त्या पूर्वीच पोलिसांनी हा कार्यक्रम घेण्यास विरोध केला. 


कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद


कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी ही जयंती साजरी करण्यास मज्जाव केला. त्यामुळे आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यास विरोध केल्यानंतर आता समाज पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाला निवेदन सादर केले. दरम्यान यावेळी टिपू सुलतान यांच्या पुतळ्यासाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 


बारामतीतही जयंती साजरी करण्यास विरोध


बारामतीमध्ये बजरंग दल आणि हिंदू संघटनेकडून टिपू सुलतान यांच्या जयंतीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर बजरंग दल आणि हिंदू संघटनेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. दरम्यान हा संपूर्ण वाद पोलिसांपर्यंत पोहचला. टिपू सुलतान यांची जयंती बारामती शहरात साजरी केली जाणार आहे. याच कार्यक्रमाला बजरंग दल आणि हिंदू संघटनांकडून विरोध करण्यात येत असल्याची माहिती समोर येतेय. आज टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आम्ही हे उदात्तीकरण होऊ देणार नाही, अशी भूमिका बजरंग दल आणि हिंदु संघटनांनी घेतली. त्यामुळे बारामतीमध्ये या कार्यक्रमाला विरोध करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. 


हेही वाचा : 


अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार, सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र; म्हणाल्या, गृहमंत्री सपशेल अपयशी