Dhule Crime News: धर्माची ओळख लपवून आपल्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप करत धुळे शहरातील पश्चिम देवपूर (Dhule news) पोलीस ठाण्यात एका 24 वर्षीय तरुणीने अर्शद सलीम मलिक या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित तरुणीने गुन्हा दाखल करताना अर्षदने तिला श्रद्धा वालकरचे 35 तुकडे केले. तुझे 70 तुकडे करील, अशी धमकी दिल्याचा देखील आरोप केला आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.


धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. एका 24 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीत अर्शद सलीम मलिक यांच्यासोबत जुलै 2021 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. त्या आधी 4 एप्रिल 2016 रोजी तिचा पहिला विवाह झाला होता. 2017 मध्ये तिला एक मुलगा झाला. तर सन 2019 मध्ये तिच्या पहिल्या पतीचे अपघातात निधन झाले. त्यानंतर तिची एका हर्षल माळी नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्याने तिला लळींग येथे नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. तसेच चित्रफीत बनवून तिला वेळोवेळी धमकावले, असल्याचं तरुणीनं म्हटलं आहे.


लिव्ह इन रिलेशनशिपबाबत प्रतिज्ञापत्र तयार करताना समजलं सत्य


यानंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यावर जुलै 2021 मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अमळनेर येथे प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले. ते करताना या तरुणाचे नाव हर्षल माळी नसून अर्शद सलीम मलिक असल्याचे तिला समजले. अर्शदने तिला उस्मानाबाद येथे एका फ्लॅटवर नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले, असल्याचंही तरुणीनं म्हटलं आहे. तसेच त्याचे वडील सलीम बशीर मलिक यांनी देखील तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. 


दरम्यानच्या काळात या तरुणीचे अर्शदने धर्मांतर देखील करून घेतले. या तरुणीच्या पाच वर्षाच्या पहिल्या मुलाची खतना करण्याचा अर्षदने प्रयत्न देखील केला. मात्र त्याला विरोध केल्यामुळे त्याने तिला दिल्लीतील श्रद्धा वालकर घटनेची आठवण करून देत तिचे 35 तुकडे केले गेले, आम्ही तुझे 70 तुकडे करू, अशा शब्दात धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या तरुणीने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत सदर तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. 


ही बातमी देखील वाचा