Dhule Accident News धुळे : संपूर्ण देशभरात नवीन वर्षाचे (New Year) उत्साहात स्वागत होत आहे. एकीकडे नववर्षाचा माहोल असताना दुसरीकडे मात्र शिरपूर (Shirpur) येथील दोन युवकांवर काळाने घाला घातला आहे. शिरपूर येथील चोपडा रस्त्यालगत जात असताना चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने कार नाल्यात कोसळली आणि कारमधील दोन जण ठार झाले. प्रवीण शिवाजीराव पाटील (रा. क्रांतीनगर) व प्रशांत राजेंद्र भदाणे (रा. मातोश्री कॉलनी, शिंगावे शिवार) असे मयत युवकांचे नाव आहे.
31 डिसेंबरच्या रात्री शिरपूर-चोपडा रस्त्यालगत असलेल्या सूतगिरणीच्या मागील परिसरातून हॅरियर कारने (क्र. एमएच 18, बीएक्स 1920) प्रवास करणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर कार नाल्यात जाऊन कोसळली. कारचा वेग जास्त असल्याने कारमधील प्रवीण पाटील व प्रशांत भदाणे जागीच ठार झाले. अपघातानंतर रात्रभर कार व मृतदेह घटनास्थळीच पडून होते. दोघांच्या मोबाईलवर संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पहाटे तेथून ये जा करणाऱ्या लोकांना कारच्या अपघाताबाबत माहिती मिळाली.
एक हॉटेल व्यावसायिक तर एक कॉन्ट्रॅक्टर
मृतदेहाची ओळख पटल्यावर त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघेही युवक विवाहित असल्याचे कळते. प्रवीण पाटील हॉटेल व्यवसायिक होते तर प्रशांत भदाणे यांनी अल्पावधीतच कॉन्ट्रॅक्टर म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर दोन अपघात
सोमवारी मुंबई-नाशिक महामार्गावरदेखील दोन अपघात झाले आहेत. पहिली अपघाताची घटना इगतपुरी (Igatpuri) बायपास जवळील बोरटेंभे येथे घडली. एक मर्सिडीज कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली. मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
तर दुसरी घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील पाचपाखाडी (Pachapakhadi Accident News) भागात घडली. सोमवारी सकाळी गाडीचे टायर पंक्चर झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यानंतर गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला धडक दिली. या अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
- Nashik Trimbakeshwar News : नववर्षाच्या पहिल्या दिवशी त्र्यंबकला मोठी गर्दी; दोन किमीपर्यंत रांगा, सोयीसुविधांअभावी भाविक नाराज
- Nashik News : नाशकात गॅस गळतीमुळे भीषण स्फोट, दोन गंभीर; २०२३ साली आजच्याच दिवशी घडलेल्या जिंदाल दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या