Ayodhya Ram Mandir धुळे : अयोध्या (Ayodhya) येथील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.


यासोबतच देशातील विविध प्रसिद्ध वस्तूही अयोध्या येथील राम मंदिराच्या चरणी पोहचत आहेत. यात धुळे जिल्ह्यातील सोनगीर (Songir Dhule) येथील कारागिरांनी बनविलेले पुजेसाठी लागणारे तांब्याचे दोनशे कलश अयोध्या येथे पोहचले आहेत. तर काही वेगळ्या कलशांचे काम देखील सध्या युध्द पातळीवर सुरु आहे. 


कारागिरांनी बनवले तांब्याचे 200 कलश


अयोध्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी श्रीगोविंद देवगिरी महाराज, गणेश्वर शास्त्री द्रवीड, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आचार्य लक्ष्मीकांत दिक्षीत, केशव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल केले यांनी धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील बिपीन कासार व गावातील काही कारागिरांना कलश बनवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी बनवलेले 200 तांब्याचे कलश आतापर्यंत अयोध्येला पोहोचले आहेत. 


सोनगीर गावाची ख्याती सर्वत्र पसरणार


सोनगीर येथे बनत असलेले कलश आयोध्या येथील राम मंदिरात पोहचत असल्याचा अभिमान असून खऱ्या अर्थाने आमच्या कामाची चीज झाले. यामुळे सोनगीर गावाच्या नावाची ख्याती सर्वत्र पसरणार असल्याचे कारागीर बिपीन कासार यांनी यावेळी सांगितले.


अयोध्येत तयार होणार 7 हजार किलो शिरा


नागपूर येथील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आजवर आपल्या नावे अनेक विश्व विक्रम नोंदविले आहे. यंदाच्या वेळी विशेष बाब म्हणजे अयोध्येत तब्बल 7 हजार किलो शिरा (हलवा) ते तयार करणार आहे. प्रभू श्रीरामांना भोग लावल्यानंतर हा खास शिरा अयोध्येत येणाऱ्या दीड लाख राम भक्तांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. शिऱ्यासाठी खास सर्जिकल स्टीलची कढई बनवण्यात आली आहे. 


पंतप्रधान मोदींचं 11 दिवसांचं खास अनुष्ठान


या संदेशामध्ये पंतप्रधाम मोदी यांनी म्हटलं आहे की, "अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला फक्त 11 दिवस उरले आहेत. मी भाग्यवान आहे की मी देखील या पवित्र सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी भारतातील सर्व नागरिकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवाने मला निर्माण केले आहे. हे लक्षात घेऊन मी आजपासून 11 दिवसांच्या विशेष अनुष्ठान सुरु करत आहे." असं म्हटलं आहे.


आणखी वाचा 


Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचा उत्साह परदेशातही; 'या' देशाने केली 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा