धाराशिव: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) याच्या अपहरण आणि निर्घृण हत्येला जवळपास 35 दिवस उलटले आहेत, तरी देखील अद्याप एक आरोपी फरार आहे. आज या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत, अशातच आज धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना बीडचे खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी न्यायलयीन चौकशीची बोलला ती कुठे आहे? यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची निवड केली म्हणालात कुठे आहे? नेमणूक करायची तर लवकर घोषणा करा, नायतर तोपर्यंत पुरावे नष्ट होतील. अन्यथा सतीश माने शिंदे सारख्या वकिलांची नेमणूक करा, अन्यथा खासदार म्हणून मी त्यांची फी देईन, असं म्हणत मोक्का लावला तुम्ही चांगलं केलं पण वाल्मिक कराडवर देखील मोक्का लावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 


धाराशिवमध्ये बोलताना खासदार बंजरंग सोनावणे  (Bajrang Sonawane) यांनी काही सवाल देखील उपस्थित केले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर रोजी अपहरण करून खून केला गेला. त्या क्षणापासून आजपर्यंत आपण सर्वजण त्याचा छडा लावण्यासाठी उभे आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा निघतोय. पहिला मोर्चा रेणापूरमध्ये, दुसरा मोर्चा आमच्या बीडमध्ये झाला, त्याच्यानंतर परभणीत झाला, पुण्यात झाला, पैठणमध्ये झाला, काल जालन्यात झाला आणि आज धाराशिवमध्ये होतोय. महाराष्ट्रातल्या मायबाप सरकारला माझी विनंती आहे. सर्व पक्षाचे आमदार , खासदार आम्ही सर्वजण आणि तुमच्या संहिता आपण सर्वजण एकाच गोष्टीसाठी झगडतोय, की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. त्याचा मास्टर माईंड पकडला पाहिजे, त्याला 302 मध्ये अॅड केला पाहिजे, असं सोनावणे  (Bajrang Sonawane) म्हणालेत. 


पहिल्या दिवसापासून आपली मागणी महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणाचा रास्त अभिमान असला तरी, काल बीड जिल्ह्यातल्या पोलिसाला कोर्टाला विचारलं की, 24 दिवस तुम्ही काय करत होता? माझ्या या पोलीस यंत्रणा चालवणाऱ्या सर्व सरकारला विनंती आहे, आपल्या पोलीस यंत्रणेला एवढा दिवस का लागतोय? यांचा मर्डर झाला, किडनॅपिंग झालं त्याला, आज किती दिवस उलटले ते जर मोजता मोजता तुम्हाला बघत गेलात तर जवळपास 35 दिवस या घटनेला झाले आहेत. 35 दिवसांमध्ये सुद्धा जे प्राथमिक दृष्ट्या ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला असे सात आरोपी आहेत. सात मधला एक अद्याप फरारी आहे. पोलिस यंत्रणेचं काम खूप चोख आहे असं जरी समजलं गेलं, तर यांना पाठीमागे कोण घालतंय? या गुन्हेगारांचे सीडीआर का तपासले जात नाहीत? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.


पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे की, याचा मास्टरमाइंड कोण आहे. या सात आरोपीला पकडून चालणार नाही. या सात आरोपीवर गुन्हा लावून चालणार नाही. तर याचा मास्टर माईंड जो कोण आहे, याला याच्यात घातला पाहिजे आणि मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे. त्याला 302 मध्ये दाखल केला पाहिजे तरच तुमच्या आमच्या सर्वांच्या मागणीला यश आलं असं समजलं जाईल. सरकारला सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही एसआयटी नेमली, एसआयटीमध्ये नऊ लोक घेतले ते बीड जिल्ह्यातले, एकच अधिकारी बाहेरचा. परत एक स्टेटमेंट बघितला गेला की दोन अधिकारी काढले, कोण काढले ते आणखी काही दुसरी ऑर्डर मला बघायला मिळाली नाही. पण एसआयटीमध्ये तुम्ही बीड जिल्ह्यामधल्या जे अधिकारी घेतले, ते अधिकारी कोण आहेत. या खंडणीखोर जो आरोपीमध्ये बसलाय त्यानेच या पदावर बसले त्याच्यावरच्या नेत्याच्या सहाय्याने ते पदावर बसवलेले हे अधिकारी आहेत असं म्हणत सोनावणे यांनी होत असलेल्या चौकशीवरती देखील संशय व्यक्त केला आहे. 


गळ्यात हात टाकून फोटो काढतात, डान्स करतात सोबत, असले अधिकारी यांची काय चौकशी करणार? आमचं म्हणणं आहे की या अधिकाऱ्याला त्याच्यातून बाहेर काढा. न्यायालयीन चौकशी केली जाईल असे सांगितले, न्यायलयीन चौकशीचं काय झालं? काल कुणीतरी एक स्टेटमेंट केलं. मुख्यमंत्र्यांनी की उपमुख्यमंत्र्यांनी की तिन्ही चौकशा चालू आहेत, माझ्या बघण्यात, माझ्या ऐकण्यात तरी दोनच आहेत. न्यायालयीन चौकशी कुठे आहे? न्यायालयीन चौकशी सुद्धा नाही, आणि अण्णा आपण मुख्यमंत्र्याला भेटायला गेलात. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सरकारी वकील म्हणून उज्वल निकम साहेबांची नियुक्ती करण्यासाठी मी त्यांना विचारलं. मग आता कधी नेमणार आहेत, सर्व पुरावे नष्ट झाल्यानंतर, तुम्हाला उज्वल निकम सारखे वकील नेमायचे असतील तर लगेच नेमा, नाहीतर मी आणखी एका वकिलांचं वक्तव्य ऐकलं होतं, सतीश माने शिंदे या वकीलाला सुद्धा शासनाने नेमलं पाहिजे, नाही नेमलं तर खासदार या नात्याने मी त्याच्यात त्यांची फीस भरून त्यांना त्याच्यात हजर राहायला लावेन असंही पुढे सोनावणे म्हणालेत.