Tuljapur : तुळजापूर मंदिर विकास आराखड्यात उभारण्यात येणाऱ्या शिल्पाच्या वादात आता मंदिर संस्थानाच्या एका पत्राचे भर पडली आहे. 108 फुटी प्रस्तावित शिल्पासाठी अष्टभुजा असलेल्या मूर्तीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्षेप घेतला होता .त्यानंतर आता धर्मशास्त्र आणि परंपरेनुसार मूर्ती कशी असावी यासाठी पुजाऱ्यांकडून मतं मागवण्यात आली . मात्र पुजाऱ्यांकडून मंदिरा संस्थांनी पाठवलेल्या पत्रात तुळजाभवानी मातेचा उल्लेख , " श्री तुळजाभवानी माता,भारताची भारत माता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी' असा उल्लेख करण्यात आल्याने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे .मंदिर संस्थानाने पाठवलेल्या या पत्रावर पुजारी मंडळाचाही आक्षेप आहे .

नेमका प्रकार काय?

तुळजापूर विकास आराखड्यात आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असतानाचं 108 फुटी शिल्प तुळजापुरात रामदरा तलाव येथे साकारण्यात येणार आहे . त्यासाठीच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे .मात्र शिल्प कसे असावे यावरून मतमतांतरे आहेत .मंदिर संस्थांच्या संकल्प चित्रांमध्ये तुळजाभवानी माता अष्टभुजांची असल्याचे दाखवण्यात आला आहे .मात्र याला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्षेप घेतला होता .याक्षेपानंतर मूर्ती कशी असावी याबाबत धर्मशास्त्र आणि परंपरेनुसार मत मागवण्यात येत आहेत .मात्र मत मागवण्यासाठी मंदिर संस्थांकडून पाठवलेल्या पत्रात तुळजाभवानी माता ही भारताची भारत माता आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी असा उल्लेख करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे .मंदिर संस्थानाने पाठवलेल्या या पत्रावर खुद्द पुजारी मंडळाचा आक्षेप आहे .भोपे पुजारी मंडळाने यावर आक्षेप नोंदवला आहे .

भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी

तुळजापूर येथील रामदरा तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असलेल्या आई तुळजाभवानीचे 108 फूट उंच शिल्प साकारण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी शासनाकडून विकास आराखड्यालाही मंजुरी मिळालेली आहे. मात्र, या शिल्पामधील मूर्ती अष्टभुजा दर्शवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या संकल्पचित्रावर आक्षेप घेत मूर्ती अष्टभुजा दाखवणं धर्मशास्त्रसंगत नाही, असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मंदिर प्रशासनाने मूर्ती कशी असावी यावर धर्मशास्त्र, परंपरा आणि पारंपरिक मान्यतेनुसार पुजाऱ्यांकडून लेखी मत मागवण्याचा निर्णय घेतला.

मात्र, यासाठी पाठवण्यात आलेल्या अधिकृत पत्रात "श्री तुळजाभवानी माता भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे" असा उल्लेख करण्यात आल्याने वाद निर्माण झाला. तुळजाभवानी ही महाराष्ट्राच्या लाखो भक्तांची कुलस्वामिनी आहे, परंतु तिला भारतमाता म्हणून संबोधणं धार्मिक दृष्टिकोनातून योग्य नाही, अशी भूमिका भोपे पुजारी मंडळाने मांडली आहे.

हेही वाचा