Dharashiv Theft News : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या चोरीच्या (Theft)  घटना घडत आहेत. दिवसेंदिवस अशा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. धाराशीव (Dharashiv) जिल्ह्यात देखील चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांचा फटका शेतकऱ्यांना (Farmers) देखील बसत आहे. कारण चोरटे शेतातीत विद्युत पंप, केबल, शेती उपयोगी साहित्यांची देखील चोरी करताना दिसतायेत. एक अळीच घटना धाराशीव जिल्ह्यात घटली आहे. धाराशीवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर ( MP Omraje Nimbalkar) यांच्या शेतात चोरी झाल्याची घटना घडलीय. ओमराजे निंबाळकर यांच्या शेतातील विद्युत पंपाची केबल चोरट्यांनी लंपास केलीय.


धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये झाल वाढ


धाराशिव जिल्ह्यात शेतीपंप तसेच केबल, दुचाकी, दाग दागिने, घरफोड्या या चोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. त्यातच चोरट्यांनी आता थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शेतातच डल्ला मारला आहे. चोरट्यांनी शेतातील विद्युतपंपाचे 1200 रुपयांचे केबल चोरुन नेले आहे. कोल्हेगाव शिवारातील शेतात ही चोरी केली आहे. याबाबत अशोक साठे यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदारांच्या शेतातच चोरट्यांनी डल्ला मारल्याने लोकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.


वाहन चोरीसह घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ


दिवसेंदिस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये वाहन चोरी असेल, घरफोडीच्या घटना असतील याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं नागरिक चिंतेत आहेत. दरम्यान, पोलीस प्रशासन देखील अशा घटना घडू नये म्हणून ठिकठिकाणी उपापयोजना करताना दिसत आहे. 


ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू म्हणून ओळख


ओमराजे निंबाळकर हे धारशीव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहे. ते शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर यांना ओळखलं जातं. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीच ओमराजे निंबाळकर हे पुन्हा मैदानात उतरले होते. त्यांच्या विरोधात भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्या राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटाकडून महायुतीच्या उमेदवार होत्या. अत्यंत अटीतटीची ही लढत मानली जात आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळं या निवडणुकीकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे. येत्या 4 जूनला धाराशीवचा पुढचा खासदार कोण होणार हे समजणार आहे. तोपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


''महिलांची डोकी फुटली तेव्हा निषेधसुद्धा नाही, पण बायको उमेदवार असल्याने मनोज जरांगेंची भेट''; ओमराजेंचा घणाघात