Dharashiv News : सध्या राज्यातील दूध  (milk) उत्पादक शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. कारण, एका बाजुला दुधाच्या दरात (Milk Price) घसरण झाली आहे. तर दुसऱ्या बाजुला सरकारनं जाहीर केलंलं 5 रुपयांचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालं नाही.  त्यामुळं धाराशीव (Dharashiv) जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. धाराशिवमधील शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतुन शासनाचा निषेध केला आहे. धाराशिवच्या जुनोनी गावातील दुध उत्पादकांनी अनुदान मिळाले नसल्याने आक्रमक पवित्रा घेतलाय.


दुध डेअरीसमोरच दूध ओतून निषेध


शेतकऱ्यांनी जुनोनी गावातील दुध डेअरीसमोरच दूध ओतून निषेध केला. दूध डेअरी चालकाने दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहीती, कागदपत्रे शासनाला कळवली नसल्याने अनुदान मिळाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेकडो शेतकरी प्रति लिटर 5 रुपये शासकीय अनुदानापासुन वंचित आहेत. या शेतकऱ्यांना अनुदान कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. 


काही भागात पाणी टंचाईचा प्रश्न


एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस पडतोय तर दुसरीकडे काही भागात पाणी टंचाई जाणवत आहे. या पाणीटंचाईमुळं अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कारण अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी नसल्यामुळं चारा उपलब्ध नाही. त्यामुळं जनावरं जगवायची कशी असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालाय. दरम्यान, अशा स्थितीत देखील दुधाला कमी दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. 



दुधाच्या दरात घसरण झाल्यामुळं शेतकरी आक्रमक


 

राज्यात दुधाच्या दरात घसरण झाल्यामुळं शेतकरी आक्रमक झाले होते. विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलने सुरु केली होती. त्यामुळं सरकारनं या आंदोलनांची दखल घेत पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गाईचे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना दर पडलेल्या काळात प्रतिलिटर 5 रुपयांचे अनुदान  देण्याची योजना जाहीर केली होती. शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करुन सरकारनं एक प्रकारचा दिलासा देणयाचा प्रयत्न केला होता. मात्र, अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही. त्यामुळं पाच रुपयांचे अनुदान जमी कधी होणार? असा सवाल शेतकरी करताना दिसत आहे. अनुदान मिळालं नसल्यामुळेच धाराशीव जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहे. या शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध केला आहे. 





 




 


महत्वाच्या बातम्या:


महाराष्ट्राच्या महानंदवर अखेर मदर डेअरीचा ताबा, हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण, दूध संस्थांची शिखर संस्था मोडीत