धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा विधानसभा मतदारसंघाचे (Umarga assembly constituency ) ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आमदार प्रवीण स्वामी ( MLA Praveen Swami)  हे उच्च न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात एकतर्फा निकालासाठी ज्ञानराज चौगुले यांचा अर्ज दाखल झाला आहे. माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आमदार प्रवीण स्वामी यांनी निवडणूक आयोगाच्या अटी, शर्थीनुसार निवडणूक लढवली नसल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीअंती विद्यमान आमदार प्रवीण स्वामी हे नोटीस प्राप्त झाल्यापासून उच्च न्यायालयात गैरहजर आहेत. 

Continues below advertisement

जनतेच्या दरबारात लढाई जिंकून दाखवावी, आमदार स्वामी यांचं चौगुलेंना आव्हान

आमदार प्रवीण स्वामी यांनी स्वतःच्या बाजूने वकिल न दिल्याने माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यामार्फत एकतर्फा आदेश पारित होण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, जनतेच्या दरबारात लढाई हरल्याने विरोधक हतबल झाल्याची माहिती आमदार स्वामी यांनी दिली आहे. जात वैधता प्रमाणपत्र 11 वर्षापूर्वी प्राप्त झाल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे.  सर्व नियम अटींची पूर्तता केल्याच मत आमदार स्वामी यांनी व्यक्त केले. जनतेच्या दरबारात लढाई जिंकून दाखवावी असं आव्हान देखील स्वामी यांनी दिलं आहे. सदर प्रकरणाच्या आदेशासाठी उच्च न्यायालयात 18 फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्या विरोधात जात वैधता प्रमाणपत्रावर याचिका दाखल केली आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणूकीतील पराभूत उमेदवार माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या याचिकेसह प्रवीण स्वामी यांच्याविरुद्ध इलेक्शन पिटीशनही दाखल केली होती. चौगुले यांनी निवडणुकीचे निर्णय आणि तांत्रिक बाबींवर 16 2025 या क्रमांकाची इलेक्शन पिटीशन दाखल केली होती. याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांना संभाजीनगर उच्च न्यायालयाकडून नोटीस देण्यात आली होती. उमरगा विधानसभा मतदारसंघाची 2024 निवडणूक अतिशय अटीतटीची ठरली. अटीतटीच्या या लढतीत हे प्रवीण स्वामी 94550 मते घेऊन विजयी झाले. तर ज्ञानराज चौगुले यांना 91142 मतांवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे चौगुले या मतदारसंघात सलग तीन वेळा जिंकून आले होते. असं असताना त्यांना धूळ चारण्यात प्रवीण स्वामी यशस्वी झाले

Continues below advertisement