Osmanabad Suicide News : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर 'सॉरी भावांनो.....' असा मेसेज टाकून व तोच वर्गमित्रांनाही पाठवून या तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. तर याबाबत तुळजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आविष्कार मोहन भोजने (वय 20 वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. 


उस्मानाबादच्या तुळजापूर खुर्द येथील आविष्कार भोजने याने रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून सोमवारी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तर वडिलांवर असलेल्या कर्जामुळे आविष्कार सतत तणावाखाली वावरत होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याच्या दुर्वास भोजने यांच्या खबरीवरून पोलिसांनी नोंद घेतली आहे. तर तुळजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


आविष्कार हा तुळजापूर शहरातील तुळजाभवानी महाविद्यालयात कला शाखेच्या पदवी तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. रविवारी रात्री आपल्या मोबाइलवरून आविष्कार याने वर्गातील जवळच्या मित्रांना सॉरी भावांनो असा मेसेज पाठविला. तसेच, सोशल मीडियातही हा मेसेज पोस्ट करून त्याने तुळजापूर खुर्द येथील राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याच्या काही मित्रांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आविष्कारच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास हा प्रकार आला.


सतत तणावाखाली वावरत होता....


कला शाखेच्या पदवी तृतीय वर्षात शिक्षण घेणारा आविष्कार मागील काही दिवसांपासून सतत तणावाखाली वावरत होता. घरीची आर्थिक परिस्थिती बिघडली, त्यात वडिलांवर असलेल्या कर्जामुळे आविष्कार तणावाखाली होता. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून मित्रांसोबत देखील पूर्वीप्रमाणे वागत नव्हता, एकटा-एकटा राहत होता. त्यामुळे आत्महत्या करण्यापूर्वी आविष्कार तणावाखाली असल्याचं त्याच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात येत आहे. 


कुटुंबातील सदस्यांना धक्का...


अविष्कार हा कला शाखेच्या पदवी तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याने चांगले शिक्षण घेऊन मोठं व्हावं अशी अपेक्षा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना होती. मात्र त्याने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तर त्याच्या जाण्याने भोजने कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळले आहे. तर परिसरात देखील या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने बँकेच्या सहायक व्यवस्थापकाची आत्महत्या; नांदेडमधील धक्कादायक घटना