धाराशिव : मिंध्याला दाढी खेचून आणू शकलो असतो, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता आज (7 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार करत ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला आहे. त्यांनी आज धाराशिवमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. धाराशिवमध्ये ते शिवसंकल्प अभियानात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ते दाढी खेचून आणला असता असे म्हणाले. मात्र, या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत. या दाढीने तुमच्या सत्तेचं काय केलं जगाला माहीत आहे. लोकसभेत 45 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचे आहे. विधानसभेतही विजय मिळवायचा आहे. कामाला लागलं पाहिजे. जनता आपल्या पाठीशी आहे, घरी बसणारे नकोत, त्यांना तर आधीच घरी बसवलं आहे, अशी टीका त्यांनी केली. 

त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे

शिंदे यांनी सांगितले की, शासनाच्या योजना घरा घरापर्यंत पोहचवा. आज या शिवसंकल्प अभियानात झालेली लोकांची गर्दी लक्षणीय आहे. मिशन 48 यशस्वी होईल. काही अपप्रवृत्ती आज वाढल्या आहेत. त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे.  गनिमांशी हात मिळवणी करणारे कोण हे आपणास माहीत आहे. बाळासाहेबांचे विचार हे लोक पुढे नेत नाहीत. शिवसेनेचा विचार पुढे नेण्यासाठी अनेकांनी त्याग केला. त्यांनाच हे मार्गातून बाजूला काढत आहेत. नियती तुम्हाला माफ करणार नाही. तुमच्या बाजूचे लोकच तुम्हाला खड्ड्यात टाकत आहेत, आम्ही ते पाप करणार नाही. 

तुमच्याकडे माणसेच नाहीत तर तुमच्याकडे शिवसेना कशी?

आपल्या हातात धनुष्य बाण आहे. प्रभू श्रीरामाचा धनुष्य बाण आपल्या बरोबर आहे. त्यांना त्याची जागा आपण दाखवू.  राज्यात प्रत्येक ठिकाणी लोक येत आहेत. ते बाळासाहेबांच्या विचारा मागे आहेत. ते त्यांच्या बाजूने नाहीत. तुमच्याकडे माणसेच नाहीत तर तुमच्याकडे शिवसेना कशी? रडगाणे रोज आहे हे चोरले ते चोरले, यांना विचार नको, यांना स्वार्थ साधायचा होता फक्त. एका मिनिटात शिवसैनिकांच्या खात्यातील पन्नास कोटी त्यांनी घेतले. परवा त्यांना तर देशाच्या प्रधानमंत्रीचे स्वप्न पडले. फेसबुकlive वरील प्रधानमंत्री. सोन्याचा चमचा घेऊन जन्म घेतल्यावर ह्यांना सर्व सामान्य लोकांचे प्रश्न कसे कळणार? कुठे फेडणार हे पाप? अशी विचारणा त्यांनी केली. 

आम्ही मुख्यमंत्री झालो तर सहन होत नाही का?

बाळासाहेब भूमिका घेतल्यावर ते बदलत नव्हते मात्र हे सतत भूमिका बदलत असतात. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन काम करतो. सतत आमच्या कृतीवर टीका होते. मनातील जळफळात का आहे. आम्ही सर्वसामान्य लोक आहोत आम्ही मुख्यमंत्री झालो तर सहन होत नाही का? पुन्हा एकदा मोदी सरकार येणार यात शका नाही. पुढील पाच वर्ष 80 कोटी लोकांना मोफत अन्न धान्य देण्याची योजना आहे., फिर एक बार 45 पार असेच काम करायचं असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या