Dharashiv News : धाराशिव शहरात (Dharashiv City) दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास समोर आली आहे. खाजा नगर व गणेश नगर भागात हा प्रकार घडला. अज्ञात कारणाने दोन गट आमने सामने आल्यानंतर दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे. मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने पोलिसांनी आश्रूधुराच्या 3 नळकांडया फोडत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (IPS Atul Kulkarni) यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, तणाव निवळला आहे. तसेच, परिस्थिती पूर्वपदावर आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका यु ट्यूब चॅनलच्या (YouTube Channel) पत्रकारामुळे जमाव भडकवल्याचा आरोप करण्यात येत असून, त्याला पोलिसांनी अटक देखील केली आहे.
धाराशिव शहरात सोमवारी रात्री दोन गटात वाद झाला. वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. त्यामुळे दोन्ही गटातील जमाव आमने-सामने आला आणि दगडफेक झाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, जमाव मोठा असल्याने अधिकचा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी घटनास्थळी पोहचले. यावेळी पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी आश्रूधुराच्या 3 नळकांडया फोडण्यात आल्या. त्यानंतर जमाव कमी झाला. पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून, आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहेत. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जवळपास 125 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल
दोन गटातील वादानंतर पोलिसांनी कारवाईला सुरवात केली आहे. धाराशिव शहरात झालेल्या राड्यानंतर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 307 व इतर कलम अंतर्गत जवळपास 125 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, दगडफेकीच्या घटनेत अनेक वाहनाचे, दुकानाचे नुकसान झाले आहेत. तसेच, 4-5 लोकं जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून इतर आरोपींचा देखील शोध घेतला जात असून, त्यांना देखील अटके केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
यु ट्यूब चॅनलच्या पत्रकाराने जमाव भडकवल्याचा आरोप
धाराशिव राडा प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात 125 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक देखील केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी एका यु ट्यूब चॅनलच्या पत्रकाराला देखील अटक केली आहे. त्याच्यावर जमाव भडकवल्याचा आरोप असून, अल्ताफ शेख असे त्याचे नाव आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
मोठी बातमी : उस्मानाबादमध्ये भाजपची मोठी चाल, थेट IAS अधिकाऱ्याला तिकीट देण्याच्या हालचाली