Dharashiv : धाराशिवमध्ये सुपारी तस्करीच मोठं रॅकेट उघड झालं आहे. तब्बल 2 कोटी 25 लाखांची सुपारी जप्त करण्यात आली आहे. अन्न औषध प्रशासन आणि धाराशिव पोलिसांनी नळदुर्ग जवळील फुलवाडी टोलनाका इथं ही संयुक्त कारवाई केली आहे. राजस्थान, गुजरात, कर्नाटक पासिंगच्या 12 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
खराब असलेल्या सुपारीत गुटखा मिसळला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुपारी कुठून आली आणि कुठे जाणार होती याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, इतक्या मोठ्या किंमतीची म्हणजे तब्बल 2 कोटी 25 लाखांची सुपारी जप्प केल्यानं धाराशिवमध्ये खळबळ उडाली आहे. एवढी मोठी सुपारी नेमकी कुठे जात होती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुपारीच्या 12 डाग्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गाड्या राजस्थान, जुगरात आणि कर्नाटक पासिंगच्या आहेत. त्यामुळं या राज्यातून महाराष्ट्रात सुपारीची तस्करी केली जातेय का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या: