धाराशिव : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढा येथील आमदार अभिजित पाटील (Abhijit Patil) यांच्या साखर कारखान्यात 1 कोटी 10 लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. धाराशिवमधील साखर कारखान्यात ही ऑनलाईन फसवणूक (Online fraud ) झाल्याचा प्रकार घडला आहे. धाराशिव कारखान्याचे चेअरमन असल्याचे भासवत 1 कोटी 10 लाखांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे.  

Continues below advertisement

नेमकी कशी झाली फसवणूक?

मिळालेल्या माहितीनुसार, चोराखळी येथील धाराशिव (Dharashiv) कारखान्याचे बाबासाहेब कचरु वाडेकर यांची फसवणूक झाली आहे. त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करायला लावत ही फसवणूक झाली आहे. कारखान्याचे एमडी अमर पाटील असल्याचे भासवत, तसेच अमर पाटील यांचा फोटो डीपी ला ठेवत फसवणूक केली आहे. कारखान्याचे एमडी अमर पाटील हे आमदार अभिजित पाटील यांचे बंधू आहेत. याप्रकरणी धाराशिव सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधात सायबर पोलिसांकडून पथक तैनात करण्यात आले आहे. 

अभिजीत पाटील हे माढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचे पाच साखर कारखाने आहेत. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी इथं एक त्यांचा साखर कारखाना आहे. या कारखान्यात ही घटना घडली आहे. अभिजीत पाटील यांचे बंधू अमर पाटील हे या कारखान्याचे एमडी आहेत. अमर पाटील असल्याचे भासवत  बाबासाहेब कचरु वाडेकर यांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत. 

Continues below advertisement

कशी होत ऑनलाईन फसवणूक?

अनेकदा आपल्या बॅंक अकाऊंटमध्ये फुकटचे पैसे आले की ते पाहून आपल्याला आनंद होतो. या आनंदात आपण इतके मग्न होतो की हे पैसे आपल्याला कुठून आले, कसे आले याचा देखील आपल्याला विसर पडतो. पण, खरंतर हीच खरी स्कॅमची सुरुवात असते. एकदा पैसे पाठवल्यानंतर फसवणूक करणारे हे लोक पैशांची मागणी करू लागतात. आपल्या बोलण्यात गुंतवून किंवा जाळ्यात अडकवून हे लोक तुमच्या बॅंकेची माहिती आणि ओटीपी चोरतात. कळत नकळत बॅंकिंग डिटेल्स देण्याची आपण जी चूक करतो ही चूक पुढे आपल्यालाच महागात पडू शकते. तुमच्या याच चुकीमुळे स्कॅम करणारे या संधीचा फायदा उचलतात. 

महत्वाच्या बातम्या:

Bhiwandi Crime News : ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 12 मोबाईल, 12 डेबिट कार्ड अन् 17 चेक बुकसह अनेक कारनामे उघड