Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) चार्जशीट मधून जे समोर आलं तेच आम्ही आधीपासून बोलत होतो. संतोष अण्णा देशमुख प्रकरणांमध्ये मुख्य मास्टर माईंड आणि सुत्रधार वाल्मिक कराडच (Walmik Karad) आहे. धनंजय मुंडे म्हणतात वाल्मिक कराड माझा निकटवर्तीय आहे. निकटवर्तीय आहे म्हणजे सगळे अधिकार त्याला दिले का? घटनाक्रम बघितला तर घुलेला कराडने फोन कधी केला, हे सगळं समोर आलं आहे. त्यामुळे मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड समोर आला आहे. परिणामी आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा द्यावा. असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar)यांनी जोरदार घणाघात केला आहे.
वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी कोण प्रयत्न करत होतं?
सभागृहमध्ये विषय झाल्यानंतर जे कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा दिला जाईल, असं सरकारकडून सांगितलं गेलंय. वाल्मिक कराड एवढा मोठा माणूस नाही की त्याचा गुन्हा दाखल करायला 24 तास लावले, संरक्षण देण्याचा त्याला प्रयत्न केला. महादेव मुंडे प्रकरणात सुद्धा न्याय मिळावा, असा आता सगळ्यांना वाटत आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे सुद्धा आंदोलनाला बसल्या आहेत. त्यांना सुद्धा वाटतं या प्रकरणातील आरोपीला सुद्धा शिक्षा मिळवी. पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर समोर आणले तर सगळेच आणखी अजून समोर येईल. वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी कोण प्रयत्न करत होतं? कोण दबाव टाकत होतं? हे सुद्धा समोर येईल, असेही आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले.
महादेव मुंडे खून प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांचे उपोषण
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे या आजपासून(3 मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बासल्या आहेत. परळीतील महादेव मुंडे यांचा 16 महिन्यांपूर्वी परळी तहसील परिसरात खून झाला होता. यातील आरोपी अद्यापही अटक नाहीत. त्यामुळे यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे उपोषण करत आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या खून प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली. मात्र तरी देखील अद्याप यातील एकाही आरोपींना अटक झालेली नाही. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणाला मस्साजोग ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिला आहे.
हे ही वाचा