Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सुत्रधार वाल्मिक कराडच (Walmik Karad) असल्याचं 66 पुरावे आणि 184 जबाब तपासल्यानंतर दोषारोपपत्रातून समोर आलंय. वाल्मिक कराडची बीडमधली दहशत,खंडणी मागण्यासाठी त्याने जमवलेली टोळी,वाल्मिकला असणारं राजकीय पाठबळ, वारंवार समोर येत असताना आता बीडच्या कारागृहात वाल्मिकला 'व्हीआयपी ट्रिटमेंट' देण्यात येत असल्याचा पुन्हा एकदा आरोप होतोय. देशमुख कुटुंबियांच्या या आरोपानंतर मोठी खळबळ उडालीय. बीडच्या जिल्हा कारागृहातील 3 बराकींमधील सीसीटीव्ही (CCTV) 4 दिवस बंद असल्याचं समोर आलंय. यात वाल्मिकला ठेवलेल्या बराखीचाही समावेश आहे .तांत्रिक कारणामुळे कॅमेरे बंद असल्याचं कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे .कारागृहांच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असून केबल तुटले होते .चार दिवसात दुरुस्ती झाली आहे .आता सर्व कॅमेरे सुरू आहेत .मात्र माहिती अधिकारातही सीसीटीव्ही फुटेज देता येत नाही अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली. (Beed)

नक्की प्रकरण काय?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी विष्णू चाटे लातूरच्या कारागृहात आहे तर बाकी वाल्मिकसह इतर आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत .या कारागृहातच वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांकडून केला जातोय .बीडच्या कारागृहातील तीन बराकींचे सीसीटीव्ही चार दिवस बंद असल्याचे उघडकीस आले आहे .यात वाल्मिक कराडच्या बराकीचाही समावेश होता .

प्रशासनानेही सीसीटीव्ही बंद असल्याचे कबूल केले असून 6 , 7आणि 9 या क्रमांकाच्या बराकीमधील CCTV बंद पडल्याचे प्रशासनाने म्हटले आहे . 9 क्रमांकाच्या बराकीत वाल्मिक कराड आहे .कारागृहाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असल्याने केबल तुटले .त्यामुळेच सीसीटीव्हीचे केबल जळाले होते .एजन्सीला पत्र दिल्यानंतर तीन ते चार दिवसात दुरुस्ती झाली .त्यामुळे चार दिवस तीन बराकीमधील कॅमेरे बंद होते .आता सर्व कॅमेरे सुरू आहेत .14 जानेवारीला कॅमेरे बंद नसल्याचेही कारागृह प्रशासनानं स्पष्ट केलं .

करदोड्याने मूठ करत मारहाण, आरोपी जोरजोरात हसत होते..

मकोका अंतर्गत वाल्मिकसह आरोपींची रवानगी बीडच्या कारागृहात करण्यात आल्यानंतर आरोपींसह वाल्मिकला   खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांची हत्या या तिनही घटनांचा एकमेकांशी सहसंबंध असल्याने या तिन्ही गुन्ह्यांचा दोषारोपपत्रात एकत्र उल्लेख आहे. यात वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातूनच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं समोर आलंय. इतक्या निर्घृणपणे ही हत्या झाली की करदोड्याने मूठ करून मारहाण करत हत्या करताना आरोपी जोरजोरात हसत होते. देशमुख यांचे कपडे काढून बेदम मारहाण करताना आरोपी घटनेचा आनंद साजरा करत होते असा आरोपपत्रात उल्लेख आहे. यासंदर्भात केलेला व्हिडिओही सीआयडीच्या हाती लागला आहे.

 

हेही वाचा:

संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपचं नाव 'मोकारपंती'; आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा