Dhananjay Munde पुणे: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) मोठा दणका दिला आहे. करुणा शर्मा यांना लागू झालेल्या पोटगीतील 50% रक्कम चार आठवड्यात न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. “मुंडे हे मूळात चांगले आहेत, पण त्यांच्यामागे असलेल्या ‘दलाल गँग’मुळेच त्यांची चुकीची पावलं पडत आहेत,” असा दावा करुणा मुंडे यांनी केला. सोबतच कोर्टाची मी आभार मानते, त्यांनी मला न्याय दिला. अशी प्रतिक्रिया ही त्यांनी यावेळी दिली आहे.

Continues below advertisement


चार आठवड्यात पोटगीतील 50% रक्कम न्यायालयात जमा करण्याचे निर्देश


माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने करुणा मुंडे यांना पोटगी पोटी देण्यात येणाऱ्या 2 लाख रुपये रकमेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी प्रकरणात धनंजय मुंडे यांनाच उच्च न्यायालयाने दणका दिल्याच पाहायला मिळत आहे. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा या पोटगीस पात्र असल्याचं मान्य करत त्यांना दरमहा 1 लाख 25 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. यालाच धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि यावर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठापुढे सुनावणी पार पडली आणि न्यायमूर्ती यांनी धनंजय मुंडे यांनाच दणका दिला 


उच्च न्यायालयाने काय निर्देश दिले?


ऑगस्ट 2022 ते जून 2025 या 35 महिन्यांच्या कालावधीची एकूण रक्कम 43 लाख 75 हजार इतकी आहे. यातील 21 लाख 87 हजार 500  रुपये ही 50 टक्के रक्कम वांद्रे न्यायालयात पुढील 4 आठवड्यात जमा करा. तसेच करूना मुंडे यांची मुलगी हिच्यासाठी असलेली पोटगीची रक्कम 100 टक्के कोर्टात जमा करा. या याचिकेवर 8 आठवड्यांनी अंतिम निर्णय देऊ, असे कोर्टाने म्हटले आहे. 


..तोपर्यंत मी शांत बसणार नाही- करुणा मुंडे


करूना मुंडे यांच्यावतीने धनंजय मुंडे अजूनही आपल्याला त्रास देत असून त्यांच्या लोकांकडून न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असताना देखील दररोज जीवे मारण्याची धमकी येत असल्याची तक्रार करण्यात अली आहे. तसा अर्ज वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. यामध्ये धमक्यांसोबत मोबाईलवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून अश्लील व्हिडिओ पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अशातच कोर्टात धनंजय मुंडे यांनी याचिका दाखल केली होती, त्यांनाच आता कोर्टाने फटकारले आहे आणि माझी आत्तापर्यंतची पोटगीची 50 टक्के रक्कम आणि माझ्या मुलीची 100 टक्के रक्कम कोर्टात जमा करायला लावली आहे. अशी प्रतिक्रिया करूना मुंडे  यांनी यावेळी दिली आहे. शिवाय माझे सगळे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असेही त्या म्हणाल्या. 



हे ही वाचा