Man Quits Job On First Day : आजकाल लोकांना लवकर नोकऱ्या मिळत नाहीत. एकदा नोकरी मिळाल्यानंतर ती नोकरी टिकून राहण्याकरता लोक किती काही करत असतात. मात्र अशातच दिल्लीमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. ऑफिसला जाण्याकरता खूप वेळ लागतो म्हणून एकाने नोकरीच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिला. रेडिटवर एका व्यक्तीने पोस्ट लिहित माहिती दिली. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. कंपनी मला पगार चांगला देत असल्याकारणाने मी ही नोकरी स्विकारली. मात्र, पहिल्याच दिवशी ऑफिस फार दूर असल्याचे माझ्या लक्षात आले आणि त्यानंतर मी हा निर्णय घेतला असेही त्याने म्हटलं आहे.
पोस्टवर लोकांनी केल्या अनेक कमेंट्स
रोज सकाळी आपल्या ऑफिसला जाणं हे फार जिकरीचं होऊन जाईल असं या व्यक्तीला पहिल्याच दिवशी ऑफिसला पोहोचल्यावर जाणवलं. येण्याजाण्यात खर्च होणारा प्रवासाचा वेळ, ऑफिसचा वेळ या साऱ्यातून स्वत:साठी केवळ 3 तासच फ्री मिळतील असं त्याच्या लक्षात आलं. दुसऱ्या ठिकाणी राहायला जाण्यास पण अडचण असलेल्या या व्यक्तीने आपल्या अनुभव रेडिटवर शेअर केला आहे. त्याने येथील फॉलोअर्सकडून सल्ला मागितला. मग काय नेटकरी या पोस्टवर तुटून पडले आहे. काही लोकांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत तर काही लोकांनी टीका करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.
काय आहे पोस्ट
चांगल्या कंपनीत चांगल्या पगारात नोकरी मिळाली. त्यांना लोक हवे होते आणि मुलाखतीच्या काही फेऱ्यांनंतर मला लगेच कामावर घेतले. हे माझे पहिले काम असल्याने मी उत्साही झालो पण प्रवास करणे खूप जास्त होईल हे मला जाणवले. मी दिल्लीच्या नाॅर्थवेस्ट भागात (पिंक लाईन) राहतो आणि नोकरी 'मॉलिसर एव्हेन्यू' मध्ये होती. थोडा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आले की, आॅफिसचे एकंदरीत काम लक्षात घेता मी फक्त दिवसभरातील तीन तास घरी असेन. तसेच प्रवासाकरता पाच हजार रूपये महिना खर्च येऊ शकतो आणि मी दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याकरता तयार नाही.
पुढे त्याने लिहिले आहे की, "मी चूक केली. इतर प्रत्येक व्यक्ती इतका प्रवास करतो हे मला माहीत नव्हते. माझ्याशी बोलायला कोणीच नव्हते म्हणून मी कोणताही विचार न करता निर्णय घेतला. मी आणखी चांगली कामगिरी करेन आणि पुढच्या वेळी मला मिळणारी दुसरी संधीचा फायदा करून घेईन."