Deepika Padukone-Ranveer Singh : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha 2024) महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत साऱ्यांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, रेखा ते रणबीर कपूर, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण यांसह अनेक कलाकारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचप्रमाणे या कलाकारांनी इतरांनाही मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. पण यासगळ्यामध्ये विशेष चर्चा झाली ती, होणाऱ्या आई आणि बाबाची, म्हणजेच अभिनेता रणवीर सिंह (Raveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukon) या दोघांची.
मतदानाला आल्यावर सर्वांच्याच नजरा या दीपिकाच्या बेबी बंपवर गेल्या. व्हाईट कलरच्या लूज शर्टमध्ये दीपिकाचे बेबीबंप दिसलं. दीपिकाचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दीपिका आणि रणवीर या दोघांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची गुडन्यूज त्यांच्या चाहत्यांना दिली. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा सुरु होती.
रणवीर -दीपिकाने बजावला मतदानाचा हक्क
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या दोघांनी सकाळी 11 नंतर त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. वांद्रे येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं. यावेळी या दोघांनी त्यांच्या आऊटफिटमध्ये ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळालं. व्हाईट शर्ट आणि ब्लू जिन्स दोघांनी घातली होती. या लूज व्हाईट शर्टमध्ये दीपिकाचे बेबी बंपही दिसले. या दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. त्याचप्रमाणे या गर्दीत रणवीरही दीपिकाची काळजी घेताना दिसला. सध्या या दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.
जोडप्याने 2018 मध्ये केलं लग्न
दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक आहेत. या दोघांची लव्ह स्टोरी रामलीला चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. 2012 मध्ये त्यांनी डेटिंगला सुरुवात केली. त्यानंतर 2018 मध्ये या जोडप्याने इटलीतील लेक कोमोमध्ये डेस्टिनेशन वेडिंग उरकलं. दीपिकाचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट फायटर होता, त्याला लोकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तिचे अनेक आगामी चित्रपट देखील रांगेत आहेत, ज्यात कल्की 2898 एडी, सिंघम अगेन यांचा समावेश आहे.