Auction for properties of Dawood Ibrahim : मुंबईत (Mumbai) 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या महाराष्ट्रातील 4 मालमत्ताचा (Auction for properties) आज (दि.5) लिलाव झाला. दहशतवादी दाऊद इब्राहिमची आई अमीना बी हिच्या नावावर रत्नागिरीतील  (Ratnagiri) खेड (Khed) तालुक्यात 4 मालमत्ता होत्या. रत्नागिरीतील मुंबके या गावी या मालमत्ता आहेत. त्यातील 2 मालमत्तांचा आज लिलाव झाला. एका मालमत्तेसाठी 2.01 तर दुसऱ्या मालमत्तसाठी 3.28 लाखांची बोली लागली. तर इतर 2 मालमत्ता विकल्या गेलेल्या नाहीत. 


अर्थ मंत्रालयाच्या राजस्व विभागाद्वारे मुंबईतील (Mumbai) आयकर कार्यालयात (Income Tax Office) हा लिलाव पार पडला. महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात त्याची जमीन होती. या जमिनीचा लिलाव आज पार पडला. यावर 19 लाखांची बोली लागली. लिलाव करण्यात आलेल्या स्थावर मालमत्तेमध्ये दाऊदच्या घराचाही समावेश आहे. या घरातच त्याने लहानपण घालवले होते. 


दाऊदच्या संपत्तीच्या लिलावाच्या सुरुवातील शिवसेना नेते आणि वकिल अजय श्रीवास्तव हे देखील सामील झाले होते. श्रीवास्तव यांनी 2001 मध्ये दाऊदच्या अनेक मालमत्तांवर बोली लावली होती. सध्या ते कायदेशीर मार्गात अडकले आहेत. मात्र, अजूनही श्रीवास्तव यांना आशा आहे. ते लवकरच दाऊदच्या घराच्या ठिकाणी शाळा सुरु करणार आहेत. 


2020 साली देखील रत्नागिरीतील मालमत्तेचा केला होता लिलाव


भारतातल्या काळ्या कारवायांचं मूळ असलेल्या दाऊदबद्दल (Dawood Ibrahim) अनेक नाना तर्कवितर्क समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.  कधी त्याच्या वास्तव्याबद्दल तर कधी त्याच्या प्रकृतीबद्दल  अशा अनेकदा अफवा समोर आल्या आहेत. त्यानंतर दाऊद चर्चेत राहतो. तीन वर्षांपूर्वी देखील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटे येथील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता.  2020 साली 1.10 कोटीच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला होता.दोन फ्लॅट आणि बंद पडलेल्या पेट्रोलचा लिलाव करण्यात आला होता. 


दाऊद जगातील सर्वात श्रीमंत गँगस्टर


दाऊदचा इब्राहिम पाकिस्तानात राहून तिथून त्याच्या काळ्या कारवाया करतो. अनेद देशात कायदेशीर आणि बेकायदेशीरपणे त्याचे काळे धंदे सुरू आहेत. या काळ्या धंद्याच्या जोरावर दाऊद जगातील  सर्वात श्रीमंत गँगस्टर बनला आहे. फोर्ब्ज मासिकाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार 2015 साली दाऊदची संपत्ती जवळपास 6.7 बिलियन डॉलर आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Mohol : समाजकारणातून राजकारणातील एन्ट्रीची महत्वकांक्षा अन् त्यापूर्वीच दिवसाढवळ्या गेम; कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा भयावह शेवट