Dahihandi Live Mumbai Thane मुंबई: दहीहंडी उत्सवानिमित्त (Dahihandi Mumbai Thane) मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांसारख्या मोठ्या हंड्या उभारण्यात आल्या आहेत. 


ठाण्यातील दहीहंड्या- (Dahihandi 2024)


संस्कृती युवा प्रतिष्ठान-


प्रताप सरनाईक -  या ठिकाणी प्रो गोविंदाचा आयोजन केलं गेलं आहे. विश्व विक्रम करणाऱ्या पथकाला 11 लाख रुपये दिले जातील. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. 


मनसे दहीहंडी ठाणे- 


इथे सर्वात आधी सकाळी 9.30 जय जवान गोविंदा मंडळ आणि शिवसाई गोविंदा पथक 9 थर रचणार आहे. राज ठाकरे संध्याकाळी 6 वाजता येण्याची शक्यता आहे. त्यांच्या उपस्थितीत जय जवान गोविंदा पथक 10 थर रचून विश्व विक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. इथे 10 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखाच पारितोषिक दिलं जाणार आहे. 


 टेंबी नाका दहीहंडी - 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हंडी...दुपारी 12.30 वाजता एकनाथ शिंदे कार्यक्रमास्थळी येणार, त्यानंतर दहीहंडीला सुरुवात होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, आणि अवधूत गुप्ते  आणि इतर सेलिब्रिटी येतील. 


 ठाणे भाजप दहीहंडी (शिवा पाटील)- 


स्वामी प्रतिष्ठान (शिवाजी पाटील) मेडोज हिरानंदानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सेलिब्रिटी गणेश आचार्य आणि टीम कॉमेडियन कृष्णा अवधूत गुप्ते आणि टीम सरदार प्रतापराव गुजर यांच्यावर स्पेशल परफॉर्मन्स. 


 संकल्प प्रतिष्ठान, ठाणे (रवींद्र फाटक, रघुनाथ नगर) 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स.10.30 वा. उद्योग मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती. दु.1 ते 4 दरम्यान सिने अभिनेते सुनिल शेट्टी चंकी पांडे तसेच इतर बॅालिवुड स्टार अवधुत गुप्ते तसेच मराठी सिने सृष्टीमधील दिग्गज कलाकारांची उपस्थिती. सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत अभिनेते सुशांत शेलार यांचा समर्थ व्हिजन प्रस्तुत मनोरंजनपर कार्यक्रम 


 राजन विचारे आयोजित दहीहंडी- इथे दुपारी 2 पर्यंत आदित्य ठाकरे येतील. 


 गोकुळ दहीहंडी, कॅसलमील चौक (भाजप, कृष्णा पाटील) - एकुण 55 लाखांची बक्षिसे


मुंबईतील दहीहंड्या- 


दादर आयडीयल दहिहंडी - 


यंदा ही दहिहंडी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळाच्या माध्यमातून. सकाळी 9 ते 10 मध्ये उद्यान गणेश येथे पुजन, सिनेकलाकार उपस्थित असतील. पर्यावरण विषषावरील पथनाट्य होतील. 10.30 ते दुपारी 3 पर्यंत सेलिब्रेटी हंडी आयडियल बुक डेपोच्या चौकात होईल. इथे महिला हंडी, अंध व्यक्तींची हंडी, दिव्यांगांची हंडी होईल...


वरळी जांबोरी मैदान भाजप - 


मुंबईतील वरळी येथील जांभोरी मैदानात यंदा दहीहंडी उत्सवाचे आयोजन भाजपचे नेते संतोष पांडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने नव्या राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजप नेते संतोष पांडे यांनी ‘परिवर्तन‘ दहीहंडीच्या माध्यमातून आपले राजकीय वर्चस्व मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत. यंदाच्या दहीहंडी उत्सवात विशेष आकर्षण "अफजलखान वध" हा देखावा ठरणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत.


प्रकाश सुर्वे, बोरिवली - 


बोरिवली माघाटणे प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी, लाखो रुपयांची बक्षीस आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कलाकारविकी कौशल,गोविंदा,करिष्मा कपूर,अमृता खानविलकर, नृत्यकलाकार गौतमी पाटील, राधा पाटील, विविध सेलिब्रिटीं एन्ट्री.


 घाटकोपर दहीहंडी राम कदम -


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, रोहित शेट्टी, सलमान खान, विकी कौशल- कटरीना कैफ, शक्ती कपूर, असराणी, जितेंद्र, जया प्रधा, गणेश आचर्य, टेरेंस लुईस, रेमो फर्नांडिस, सलीम सुलेमान, दानीश गायक,  फुकरे टीम, गदर टीम उपस्थित राहणार आहेत. 


घाटकोपर राष्ट्रवादी दहीहंडी-


घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीच्या दहीहंडीला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहतील. या हंडीत महिला आणि अंध मुलांचे पथक हंडी फोडण्यास येणार आहे.


भाजप व शिवराज प्रतिष्ठानची दहीहंडी-


भाजप व शिवराज प्रतिष्ठान मार्फत प्रवीण दरेकर यांची दहीहंडीचे आयोजन. केंद्रीय मंत्री पियुष गोयल,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते उपस्थित असतील तसेच सिनेसृष्टीतील अनेक मराठी कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत.


 आय सी कॉलनी बोरीवली, भाजप-


मुंबईचा बोरिवली पश्चिम परिसरात आय सी कॉलनी मध्ये भाजपा युवा मोर्चा च्या माध्यमातून आज संध्याकाळी 4 वाजता दहीहंडी चा आयोजन करण्यात आला आहे. या दहीहंडीमध्ये खास आकर्षण म्हणून लावणी आणि भोजपुरी संगीतसुद्धा ठेवण्यात आला आहे.


निष्ठा दहीहंडी, ठाकरे गट-


 मागील वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा युवा सेनेकडून निष्ठा दहीहंडीच आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरेचे आमदार खासदार त्यासोबत आदित्य ठाकरे या निष्ठा दहीहंडीला उपस्थिती लावतील..दुपारी बारा वाजल्यापासून या निष्ठा दहीहंडी उत्सवाला सुरुवात होईल.


 शिवडीतील भाजपची दहीहंडी- 


शिवडीत भाजपकडून मराठमोळ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार अजय चौधरी यांच्या मतदार संघात भाजपची मराठ मोळी दहीहंडी गोपाळ शिवराम दळवी यांच्याकडून आयोजित करण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार उपस्थित राहतील. त्याच सोबत अभिनेता सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, शिव ठाकरे, प्रथमेश परब, यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची हजेरी असणार आहे.


नवी मुंबईतील दहीहंड्या –


छत्रपती संभाजीराजे फोडणार नवी मुंबईतून 'महाराष्ट्राच्या परिवर्तनाची' प्रतिकात्मक दहीहंडी...आयोजन स्वराज्य पक्ष उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी केले आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उपस्थित असतील.


 शिवसेना दहीहंडी-


गौतमी पाटील संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत असेल.


सई ताम्हणकर - संध्याकाळी 7 वाजता येईल.


पुणे – सगळ्या दहीहंडी सायंकाळी 7.30 नंतर फुटणार


1)बाबू गेनू दहीहंडी मंडळ


2)दगडूशेठ दहीहंडी मंडळ


3)कोथरूड महिला दहीहंडी मंडळ.


4)पुनीत बालन दहीहंडी मंडळ. (अमित बालन यांच्या पुढाकाराने 27 दहीहंडी मंडळ एकत्र येऊन एकच दहीहंडी साजरी करणार आहे.


5)अमोल बालवडकर दहीहंडी मंडळ. ( ऑलम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसाळे आणि अभिनेत्री दिशा पटानी उपस्थित राहणार आहेत)


6) खजिना वीर दहीहंडी मंडळ.


7) गुरुजी तालीम दहीहंडी मंडळ.


पिंपरीमधील दहीहंडी –


सिने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, मूनमून दत्ता, अभिनेता प्रदीप रावत / आयोजक - योगेश लांडगे युवा मंच / ठिकाण - पीएमटी बस स्टॉप, भोसरी / वेळ - सायंकाळी 7:30 वाजता.


 कोल्हापूरमधील दहीहंड्या –


1. खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने धनंजय महाडिक युवाशक्ती यांच्या माध्यमातून तीन लाखाची दहीहंडी होणार आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात संध्याकाळी चार वाजता ही दहीहंडी होणार आहे.


2. मिरजकर तिकटी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने निष्ठा दहीहंडी होणार आहे.या ठिकाणी दीड लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले.


3. गुजरी याठिकाणी सराफ व्यावसायिकांच्या वतीने दहीहंडी साजरी होणार आहे.


छत्रपती संभाजीनगरमधील दहीहंड्या -


1. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी 11 वर्षांपूर्वी बजरंग चौक आणि पुंडलिकनगरमध्ये ‘नमो’ दहीहंडी सुरू केली. 1 लाख 51 हजारांची बक्षिसे यामध्ये दिली जातात.


2. ठाकरे गटाचे बाळासाहेब थोरात यांनी ‘धर्मरक्षक’ दहीहंडी टीव्ही सेंटरला 24 वर्षांपूर्वी सुरू केली. 1 लाखाचे बक्षीस या ठिकाणी ठेवले आहे.


3. निराला बाजार येथे शिंदेसेनेचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांनी ‘देवकीनंदन’ दहीहंडीचे आयोजन केले आहे. यामध्ये दीड लाखाचे बक्षीस आहे.


4. औरंगपुऱ्यात 25 वर्षांपूर्वी भाजपचे अनिल मकरिये यांनी ‘अश्वमेघ’ दहीहंडीचे आयोजन केले आहे. या ठिकाणी 1 लाखाचे बक्षीस आहे.


5. क्रांती चौकात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘मातृभूमी’ साडेपाच लाखांचे बक्षीस ठेवले आहे.


6. कॅनॉट प्लेसमध्ये भाजपचे प्रमोद राठोड यांची ‘स्वाभिमान’ आणि ‘रणयोद्धा’ दहीहंडीचे आयोजन आहे.


7. आर. बी. युवा मंच, स्वयंसिद्ध, नव सार्वजनिक गणेश मंडळ, गांधी पुतळा येथेही दहीहंडी होईल.


8. भाजपचे राजगौरव वानखेडे यांची जय श्रीराम दहीहंडी राजमाता जिजाऊ चौकात होणार आहे. यंदाचे हे तिसरे वर्ष आहे.


 नाशिकमधील दहीहंड्या-


1. इंद्रकुंड मित्र मंडळ (पंचवटी). आयोध्या श्रीराम मंदिर प्रतिकृती. बक्षीस 51 हजार वेळ - सांय 7 वाजता


2.मॅरेथॉन चौक मित्र मंडळ आणि पोलीस बॉईज ग्रुप आयोजित. वेळ - सांय ६ वाजता. बक्षीस ट्रॉफी आणि 21 हजार रुपये


3.श्रीकृष्ण मंदिर पंचवटी कृष्णमंदिर मित्र मंडळ 5 थर. वेळ - 6 वाजता


4.युवासेना पश्चिम विधानसभा आयोजित सिडकोतील डोळ्यावर पट्टी बांधून दहीहंडी फोडणे उत्सव. वेळ सायंकाळी 6.वाजता बक्षीस - सोन्याची नथ, पैठणी, शालेय वस्तू


महाराष्ट्रातील इतर ठिकाणांच्या दहीहंडी-


अमरावती – सायंकाळी 5 वाजता - अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात टी राजा सिंह ठाकूर यांची दहीहंडीत हजेरी.भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ठाकूर प्रमोदसिंह गडरेल यांच्या शक्ती फाउंडेशन कडून परतवाडा येथे भव्य दहीहंडीचं आयोजन. यावेळी हैदराबाद येथील टी राजा सिंह ठाकूर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे सोबतच पहेलवान संग्राम चौगुले विशेष आमंत्रित राहणार आहे. या वेळी अँकर हर्षा रिचारिया राहणार. या दहीहंडीत अंदाजे 20 ते 25 हजार युवक सहभागी होतील असा आयोजकांनी सांगितले.


नागपूर- इतवारी नवयुवक मंडळ - वेळ दुपारी 4 वाजता. बक्षीस: 1,51,151


पालघर –  माऊली प्रतिष्ठान च्या वतीने दोन लाख 22 हजार 222 रुपयाची दहीहंडी...


रत्नागिरी–  रत्नागिरी जवळच्या मांडवी समुद्रकिनारी उभारली जाणारी उदय सामंत यांची दहीहंडी. बक्षीस - दीड लाख रुपयांचा बक्षीस. वेळ - दुपारी दोननंतर


चंद्रपूर - कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने आज महर्षी विद्या मंदिर येथे दही हंडी आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने कृष्ण वेशभूषा स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे, चंद्रपूर शहरातून शाळेच्या वतीने काढण्यात येणारी शोभायात्रा अतिशय आकर्षक असते, सकाळी 9 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल.


शिर्डी – आज सोमवारी रात्री 12 वाजता साई मंदिरात कृष्ण जन्म सोहळा पार पडणार असून आज दुपारी 12 वाजता दहीहंडी सोहळा पार पडेल.


जळगाव - गोकुळाष्टमी निमित्ताने युवाशक्ती फाऊंडेशन कडून महिलांची  दही हंडी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आ सुरेश भोळे,माजी महापौर जयश्री महाजन,जिल्हाधिकारी ,एस पी आणि विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.


सोलापुरात - वडार समाजाच्यावतीने दहीहंडी साजरी करण्यात येणार असून महिला सन्मान ह्या थीमवर ही यंदाची दहीहंडी साजरी करणार आहेत. या दहीहंडीला खासदार प्रणिती शिंदे उपस्थित असणार आहेत.