Cough Syrup News : विषारी कफ सिरपमुळे चिमुकल्यांना विषबाधा (Cough Syrup) होऊन होणाऱ्या मृत्यूच्या (Cough Syrup Deaths Case) घटनेत दिवसागणिक वाढ होत असल्याचे भयावह प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक घटनांमुळे देशभरात सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या गंभीर प्रकरणी आता देशभरात केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे लहान मुलांना ‘कफ सिरप’च्या वापराबाबत दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. अशातच या विषारी कफ सिरपमुळे नागपुरात गेल्या 24 तासात आणखी दोन बाळाचा दुर्दैवी मृत्यू (Cough Syrup Deaths) झाला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत मृतांची संख्या हि तब्बल 19 वर पोहचहली आहे.

Continues below advertisement


Cough Syrup Deaths Case : विषारी कफ सिरपमुळे नागपुरात गेल्या 24 तासात आणखी दोन चिमुकल्यांचा मृत्यू


मध्यप्रदेशमधील घातक आणि दूषित कफ सिरफमुळे काल (7 ऑक्टोबर) दिवसभरात आणखी दोन बालकांचा नागपुरातील वेगवेगळ्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन वर्षांच्या जयूशा यदुवंशीचा मृत्यू काल दुपारी झाला. तर एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन वर्षाच्या वेदांश पवारचा मृत्यू काल संध्याकाळी झाला आहे. त्यापूर्वी सोमवारी रात्री धानी डेहरिया या दीड वर्षांच्या चिमुकलीचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला होता.


MP Cough Syrup News: नागपुरात तीन लहानग्यांची मृत्यूशी झुंज, प्रशासन अलर्ट मोडवर


दरम्यान, अजूनही मध्य प्रदेशातील परासिया येथील तीन मुलांवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिघेही व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान काल (7 ऑक्टोबर) रात्री उशिरा मध्यप्रदेशचे आरोग्य मंत्री व उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या बालकांची प्रकृतीची पाहणी केली आणि रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली.


Maharashtra Coldriff  Ban : महाराष्ट्रात कोल्ड्रिप सिरपवर बंदी


मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यातील कफ सिरप औषधाच्या वापरामुळे बालकांच्या मृत्यू प्रकरणानंतर आता राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. राज्यात कोल्ड्रिप सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे. एप्रिल 2017 ते मे 2025 या कालावधीतील कोल्ड्रिप सिरप मेडिकलमध्ये असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याच्या सूचना देण्यात आली आहे.


महाराष्ट्राच्या (Maharashtra) एफडीएने (FDA) रेस्पिफ्रेश टीआर (Respifresh TR) आणि रीलाइफ कफ सिरप (Relife Cough Syrup) यामध्ये सुरक्षित मर्यादेपेक्षा अधिक विषारी डायएथिलीन ग्लायकॉल (DEG) असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विक्री, वितरण आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. सर्व औषध परवानाधारकांना साठ्याची माहिती तात्काळ द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.


हे देखील वाचा