मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्यासा सुरुवात करण्यात आली असून उद्यापासून सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.


राज्यात आतापर्यंत 9 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. माझं कोविड योद्ध्यांना आवाहन आहे की त्यांनी लवकरात लवकर लस टोचून घ्यावी. आता बाकीच्यांना प्रश्न पडला असेल की आम्हाला लस कधी मिळणार? यावर मी म्हणेण की ते वरच्याच्या हातात आहे. म्हणजे केंद्राच्या निर्णयावर आहे. दरम्यान, कोरोना विरोधात आपला मास्क हेच आपलं मुख्य शस्त्र असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.


घरामध्ये बंद करुन ठेवणं कुणालाही आवडणार नाही. पुढील महिन्यात कोरोनाचा देशात शिरकाव होऊन वर्ष पूर्ण होईल. या वर्षभराच्या काळात तुम्ही खूप चांगली साथ दिली. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. यात दिलासादायक गोष्ट म्हणजे आता कोरोना संसर्गावर लस उपलब्ध झाली आहे. माझी कोरोना योद्ध्यांना विनंती आहे की तुम्ही लवकर लसीकरण करुन घ्या. आता बाकीच्यांना प्रश्न पडला असेल की आम्हाला लस कधी मिळणार? यावर मी म्हणेण की ते वरच्याच्या हातात आहे. म्हणजे केंद्राच्या निर्णयावर आहे. आणखी एक-दोन कंपन्या लस उपलब्ध करुन देणार आहे.


मधल्या काळात आपल्यात शिथीलता आली : मुख्यमंत्री
मधल्या काळात आपल्यात शिथीलता आली. माझ्यातही ती आली. मात्र, याचा परिणाम आता दिसू लागला आहे. राज्यात आज सात हजारच्यावर कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 15 दिवसांपूर्वी ही संख्या अडीच हजारच्या घरात होती. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी काही लोकांनी प्रचंड मेहनत घेतली. प्रसंगी जीवाची बाजी लावली. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढत आहे. अनेक ठिकाणी कोविड योद्ध्यांचा सत्कार केला जात आहे. मात्र, असे करताना सामाजिक जबाबदारी पाळली जात नाही. अमरावतीत परिस्थिती गंभीर झाली आहे.


राज्यात सध्या 53 हजार अॅक्टीव रुग्ण आहेत. मात्र, आता काही बंधने घालणे आवश्यक आहे. उद्यापासून सर्व धार्मिक, शासकीय, राजकीय, मिरवणुका, आंदोलने यावर उद्यापासून बंधने येणार.


राज्यातील कोरोना वाढतोय
राज्यामध्ये या आठवड्यापासून कमी होत असलेला कोरोनाचा आकडा पुन्हा वाढताना दिसत आहे. काल, शनिवारी राज्यात 6281 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 2567 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत एकूण 19,92,530 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.16 % एवढे झाले आहे.