मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज 67 हजार 160 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 63 हजार 818 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 68 हजार 610 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02 टक्के झाले आहे. राज्यात आज 676 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के आहे.
मुंबई गेल्या 24 तासात 5867 कोरोना बाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 5867 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 29 हजार 817 वर पोहोचली आहे. सध्या 78 हजार 226 एकूण सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात
राज्यात 22 एप्रिलपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. तसेच आता कडक लॉकडाऊनचाही निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. तसेच राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. नव्या नियमावलीमध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये लग्न समारंभ दोन तासात आटोपून केवळ 25 जणांच्या उपस्थित सोहळा पार पाडावा, नाहीतर 50 हजारांचा दंडाची आकारण्यात येणार आहे. तसेच राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पास नाही पण फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार, असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. दिवस आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :