COMEDK UGET 2022 : कन्सोर्टियम ऑफ मेडिकल, इंजिनीअरिंग अँड डेंटल कॉलेजेस ऑफ कर्नाटकने (COMEDK) UGET 2022 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना यासाठी नोंदणी करायची आहे, ते comedk.org या अधिकृत वेब साईटवर जाऊन आपली नोंदणी करू शकतात. या परीक्षेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 2 मे 2022 आहे. तर, ही परीक्षा 19 जून 2022 रोजी घेतली जाईल.


परीक्षेसाठीच्या फीचे ऑनलाईन पेमेंट आणि व्यवस्थित भरलेले अर्ज ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सबमिट करण्याची शेवटची तारीख 2 मे आहे. हे अर्ज पुन्हा संपादित अर्थात फेरबदल करण्यासाठी 13 मे ते 16 मे दरम्यान उपलब्ध असतील. परीक्षेचे प्रवेशपत्र 6 जून रोजी प्रसिद्ध केले जाईल. तर, स्कोअरकार्ड 6 जुलै रोजी प्रसिद्ध होईल. कर्नाटक प्रोफेशनल कॉलेजेस फाउंडेशन ट्रस्ट आणि युनि-गेज सदस्य विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांत बीई/बी टेक प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाईल.


अर्ज करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा!


COMEDK 2021 अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी पात्रता निकष अधिसूचना तपासली पाहिजे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितामध्ये किमान 45% (कर्नाटक राज्यातील SC/ST/OBC उमेदवारांसाठी निकष 40%) गुणांसह 12वी उत्तीर्ण झालेले उमेदवार फक्त COMEDK UGET 2022 साठी अर्ज करू शकतात. या वर्षी बारावीत शिकणारे अर्थात चालू वर्षातील उमेदवारही यासाठी अर्ज करू शकतात. 


परीक्षा पॅटर्न  


चाचणीसाठी एकूण तीन तासांचा अवधी मिळेल. प्रश्नपत्रिका फक्त इंग्रजी भाषेतच उपलब्ध असेल. एकूण 180 गुणांच्या परीक्षेत एकूण 180 प्रश्न विचारले जातील. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितातून प्रत्येकी सुमारे 60 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण दिला जाईल. या परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंगची प्रक्रिया नसते.


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI