याआधी मारोतराव कन्नमवार यांचे मुख्यमंत्री पदावर असताना निधन झाल्यानंतर पी के सावंत हे 9 दिवसांसाठी मुख्यमंत्री होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे 80 तासासाठी मुख्यमंत्री झाले. पी के सावंत यांच्यानंतर वसंतराव नाईक हे तब्बल 11 वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून चार वेळा पदावर बसण्याचा मान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर आहे. तर वसंतदादा पाटील 2 वेळा, विलासराव देशमुख 2 वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांच्यानंतर दोन वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान देखील फडणवीस यांनी मिळवला आहे. वसंतराव नाईक यांच्यानंतर फडणवीस हे पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. फडणवीस हे 5 वर्ष 12 दिवस दिवस मुख्यमंत्री होते.
देशाच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहण्याचा योग कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना आला. 17 मे 208 ते 19 मे 2018 या फक्त दोन दिवसासाठी येडीयुराप्पा मुख्यमंत्री होते. 21 फेब्रुवारी 1998 ते २३ फेब्रुवारी 1998 या फक्त तीन दिवसासाठी जगदंबिका पाल मुख्यमंत्री होते. त्यानंतर तिसऱ्या स्थानी देवेंद्र फडणवीस हे 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 या काळात मुख्यमंत्री राहिले.
राज्यात तीन वेळा राष्ट्रपती राजवट
राज्यात आतापर्यंत तीन वेळा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यात सर्वात काळ राष्ट्रपती राजवट ही 1980 साली 112 दिवसांसाठी लागू करण्यात आली होती. त्यानंतर 2014 साली 32 दिवसांसाठी तर 2019 साली 11 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी काही कारणास्तव राजीनामा दिल्याने आमच्याजवळ बहुमत उरलेलं नाही, त्यामुळं मी राज्यपालांकडे राजीनामा देणार आहे. राज्यात भाजप चांगल्या विरोधी पक्षाचे काम करेल, असेही ते म्हणाले.