Mumbai : राज्य सरकारकडून राज्यातील विविध मेट्रो प्रकल्पांसाठीच्या कामाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून  विशेष प्रयत्न केले जात असल्याचे बघायला मिळाले आहे. मुंबई, ठाणे, मुंबई महानगरातील मेट्रोसह पुण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला भरघोस निधी देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरुपात सरकारला रक्कम मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात या बँकेसोबत बैठक घेतली होती. या बैठकीनंतर अवघ्या आठवड्याभरात बँकेकडून मेट्रोसाठी कर्ज स्वरुपात निधीची उभारणी करण्यात आली आहे. परिणामी तिन्ही मेट्रो मार्गांसाठी 272 कोटी रुपये एमएमआरडीएला वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मेट्रोच्या कामाला गती मिळणार असल्याची दाट शक्यता आहे.  


कुठल्या मेट्रोसाठी किती रक्कम?


मेट्रो-5 मार्गिकेसाठी (ठाणे-कल्याण-भिवंडी) राज्य शासनाकडून एमएमआरडीएला 23.83 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत 


मेट्रो मार्ग 9 (दहिसर ते मीरा भाईंदर) आणि मार्ग 7 अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून एमएमआरडीएला 22 कोटी रुपये कर्ज वितरीत.  


- मुंबई मेट्रो-7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून 27.50 कोटी रुपये एमएमआरडीएला कर्ज वितरीत 


- मुंबई मेट्रो-4  (कासारवडवली) आणि मेट्रो 4अ (कासारवडवली ते गायमुख) प्रकल्पासाठी राज्य सरकारचे 53.83 कोटी रुपये एमएमआरडीएला वितरीत 


- मुंबई मेट्रो 2बी (डीएन नगर ते मंडाळे) प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून 53.90 कोटी रुपये एमएमआरडीएला वितरीत 


- मुंबई मेट्रो 2 अ (दहिसर पूर्व ते डीएन नगर) प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून 27.50 कोटी रुपये एमएमआरडीएला वितरीत 


- मेट्रो लाईन 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) प्रकल्पासाठी 36.67 कोटी रुपये एमएमआरडीएला राज्य सरकारकडून वितरीत


फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर


राज्यात नवीन सरकार येताच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली ही दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. तर हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात झाली असून त्याचाच भाग म्हणून या बदल्यांकडे पाहिलं जातंय. 


Maharashtra IAS Transfer List : कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या? 



  • मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली.

  • महाजेनकोचे अध्यक्ष अनबाल्गन यांच्याकडे आता उद्योग विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी.

  • गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांकडे नागपूर टेक्सटाईल आयुक्तपदाची धुरा.

  • आयुक्त अविशांत पांडा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी पदावर बदली.

  • वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली.

  • राज्य कर सहआयुक्त सी वनमाथी यांची वर्ध्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.

  • सा वनमाथी यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ संजय पवार यांची वर्णी.

  • विवेक जोन्सन हे चंद्रपूरचे नवे जिल्हा परिषद सीईओ.

  • पुणे विभागीय महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण यांची महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या सीईओपदी बदली.

  • गोपीचंद कदम यांना सोलापूर स्मार्ट सिटी  सीईओपदी नियुक्ती


इतर महत्वाच्या बातम्या 


Beed : बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही; वाल्मिक कराडच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा इशारा