Yavatmal News : यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील वांजरी प्रकल्पासाठी शेतजमिनी हस्तगत केल्यानंतर 2017 पासून अडीच कोटींचा वाढीव मोबदला न मिळाल्याने शेतकर्‍यांनी मृदा व जलसंधारण कार्यालयावर जप्ती आणली. यावेळी कार्यालयातील सुमारे दोन लाखांचे विविध साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान खुर्ची आणि टेबल जप्त केल्यानंतर संपूर्ण कार्यालय टेबल खुर्च्या विनाच दिसून येत होते. धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्र्याच्या गृह जिल्ह्यात विभागाच्या कार्यालयाचेच साहित्य शेतकर्‍यांना जप्त करण्याची वेळ आली असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


25 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात असलेल्या वांजरी प्रकल्पासाठी शासनाने 2008 मध्ये हस्तगत केल्या होत्या. यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी 35 हजार रुपये मोबदला देण्यात आला. परंतु सदर मोबदला अल्प असल्याने शेतकऱ्यांनी 2010 मध्ये वाढीव मोबदल्यासाठी भूसंपादन प्राधिकरणाकडे न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर 2013 मध्ये भूधारकांना वाढीव मोबदल्यासाठी आदेश करण्यात आले. काही भूधारक शेतकऱ्यांना मोबदला मिळाला. मात्र मोबदल्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी औरंगाबाद येथील भूसंपादन प्राधिकरणाकडे धाव घेतली. त्यामुळे न्यायालयाने जप्तीची कारवाईचे आदेश दिले. यापूर्वी मृदा व जलसंधारण कार्यालयावर दोन वेळा जप्ती आणण्यात आली आहे. त्यानंतर आज पुन्हा जप्ती आणून कार्यालयातील विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.


20 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या वनक्षेत्रपालाला अटक  


वसई तालुक्यातील ससुनवघर येथील मालमत्तेवर ताबा मिळवून देण्यासाठी वनक्षेत्रपाल संदीप चौरे आणि  खाजगी इसम चंद्रकांत पाटील यांनी तक्रारदाराकडे  लाच मागितला होती. तक्रारदाराने पालघर अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केल्यानंतर 19 नोव्हेंबर आणि 13 डिसेंबर रोजी त्याची पडताळणी करण्यात आली. आरोपींनी ठरलेल्या 20 लाखांपैकी 10 लाखांची रक्कम स्वीकृतीसाठी तयारी दाखवली होती. आणि सापळा रचत एसीबीने खाजगी इसम चंद्रकांत पाटील याला 10 लाख घेतांना रंगेहात अटक केली आणि त्यावरुन संदीप चौरे याला ही अटक करण्यात आली आहे.


तक्रारीनुसार आरोपींविरोधात  भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एसीबी तपास करत आहे. यावेळी पालघर अँटी करप्शन ब्युरोने नागरिकांना शासकीय कामासाठी कोणत्याही लाचेची मागणी झाल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


हे ही वाचा