नागपूर :  उपसंचालक क्रीडा व युवक सेवा व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मैदानी, फुटबॉल, हँडबॉल, सॉफ्टबॉल, जलतरण, स्केटींग, कराटे, बॉक्सींग, जिम्नॉस्टीक, टेबल-टेनिस, आर्चरी, कीक-बॉक्सींग, सिकई-मार्शल आर्ट, कुस्ती या खेळाचे प्राथमिक कौशल्य विकास उन्हाळी प्रशिक्षण शिबीर 28 एप्रिल ते 27 मे या कालावधीत घेण्यात आला. या शिबीराचा समारोप कार्यक्रम 23 जून रोजी 'ऑलिंपिक डे' च्या दिवशी आयोजित करण्यात आला होता. 


या शिबीरात ब्रीज रावत, अजय कांबळे, राहुल बांते, सेलेस ढोबळे, डॉ. जाकीर खान, मानिक खडसे, श्री. कुर्वे, गणेश पुरोहित, योगेश खोब्रागडे, उज्वला लांडगे, दर्शना पंडित, मुकेश ग्यार, निलेश राऊत, संगिता राऊत, प्रितम पिंजरकर, पुरषोत्तम दारव्हनकर, सुधीर या क्रीडा मार्गदर्शकांनी संपुर्ण खेळाडूंना प्रशिक्षण दिले. या शिबीरात 500 शिबीरार्थींनी सहभाग घेतला होता.


क्रीडा व युवक सेवा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्या हस्ते खेळाडूंना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शेखर पाटील यांनी खेळाडूंना वर्षभर विभागीय क्रीडा संकुलाचा उपयोग करावा व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन केले. पल्लवी धात्रक यांनी विविध खेळाच्या क्रीडा मार्गदर्शकांना तांत्रिक बाबींबाबत खेळाडूंना मार्गदर्शन केले. जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र व सर्व संघटनाद्वारे एकत्र आयोजन करण्यात आले होते. पुढील वर्षी आणखी मोठया प्रमाणात आयोजन करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम दारव्हनकर यांनी केले तर आभार भुषण कळमकर यांनी मानले.


इतर महत्वाच्या बातम्या


Nagpur News : उपायुक्तांनी रंगेहात पकडले सातशे लेटलतिफ; हजेरीपत्रक जप्त


Nagpur Crime : दोघात तिसरा आला अन् होत्याचं नव्हतं झालं! अल्पवयीन प्रेयसीवर आधी अत्याचार नंतर जीव घेतला


Nagpur : अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शहरातील 37 ब्लॅक आणि 20 ग्रे स्पॉटवर कार्य; वाहतूक व्यवस्थेसंदर्भात 'आयरास्ते'चे आयुक्तांपुढे सादरीकरण