मुंबई: शेअर बाजारात आज सकारात्मक स्थिती दिसून आली असून शेअर बाजार (Share Market) वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 427 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 143 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.80 टक्क्यांची वाढ होऊन तो 54,178 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.89 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,132 वर स्थिरावला. आज 2201 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1013 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तर 146 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

आज शेअर बाजार बंद होताना Hindalco Industries, Titan Company, Tata Steel, JSW Steel and Larsen आणि Toubro या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर  Dr Reddy’s Laboratories, HUL, Cipla, Bharti Airtel आणि Nestle India या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही एक टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 

रुपया वधारलाडॉलरच्या तुलनेत आज रुपया काहीसा वधारला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आज 79.17 इतकी आहे. गेल्या काही दिवसांपासून रुपया घसरत आहे, आज काहीसा सावरल्याचं दिसून आलं.

आज शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स निर्देशांक 54,146 च्या पातळीवर खुला झाला.  तर, एनएसईचा निफ्टी निर्देशांक 16,113 च्या पातळीवर उघडला. बाजार सुरू होताच काही मिनिटांतच सेन्सेक्स 376.57 अंकांनी वधारला. तर, निफ्टी 116 अंकांनी वधारला आहे. सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 264 अंकांनी वधारत 54,015.62 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 79.40 अंकांच्या तेजीसह 16,069.20 अंकांवर व्यवहार करत होता. 

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली

  • Hindalco- 6.07 टक्के
  • Titan Company - 5.66 टक्के
  • Tata Steel- 4.88 टक्के
  • JSW Steel- 3.62 टक्के
  • Larsen- 3.53 टक्के

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली

  • Dr Reddys Labs- 1.22 टक्के
  • Cipla- 1.09 टक्के
  • Bharti Airtel- 1.03 टक्के
  • HUL- 1.02 टक्के
  • Nestle- 1.00 टक्के