Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरात संतापजनक प्रकार समोर आला असून, महिलेवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे महिलेने विरोध केल्याने तिला नग्न अवस्थेत झाडाला बांधण्यात आले. त्यानंतर अत्याचार करून डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. विमानतळाच्या भिंतीलगत असलेल्या मोतीवाला कॉलनीच्या जवळही घटना उघडकीस आली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील चिखलठाणा विमानतळ परिसरात राहणारी पीडित महिला लघुशंकेसाठी गेली होती. दरम्यान लघुशंकेहुन परत येत असताना विमानतळाच्या भीतीलगत राहुल संजय जाधव (वय- 19 वर्षे रा. ऋषीकेश नगर, बकाल वस्ती, चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर) प्रिंतम उर्फ सोनु महेंद्र नरवडे (वय 24), रवी रमेश गायकवाड (वय-34 वर्षे) यांनी पीडित महिलेला अडवलं. त्यानंतर त्यांना नग्न करून झाडाला बांधून अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे त्यानंतर महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान याबाबत महिलेच्या नातेवाईकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, याबाबत पोलिसांना माहिती दिली.
विमानतळ परिसरात महिलेवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी, विविध तपास पथके तयार करुन आरोपींच्या शोध घेण्यासाठी रवाना केली. त्यानंतर राहुल संजय जाधव , प्रिंतम उर्फ सोनु महेंद्र नरवडे, रवी रमेश गायकवाड या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड विधान 302, 376 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची प्रियकरासह रेल्वेसमोर उडी
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) आणखी एक धक्कादायक घटना समोर आली होती. महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या तरुणीने प्रियकरासोबत रेल्वेसमोर उडी घेत जीवन संपवलं. या तरुणीने सोमवारी 27 मार्च रोजी, सासरच्या घरातून प्रियकरासोबत पळ काढला आणि मंगळवारी 28 मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता या प्रेमीयुगुलाने छत्रपती संभाजीनगरातील एकनाथनगर येथे रेल्वेसमोर उडी मारली. दरम्यान या घटनेत प्रियकराचा जागीच मृत्यू झाला असून, प्रेयसी जखमी झाली आहे.