Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) वैजापूर शहराजवळ असलेल्या रोटेगाव परिसरातील एका फार्मसी महाविद्यालयातील प्राध्यापकाने चक्क एका युवककासोबत कुकृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कामलीलेची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या कुकृत्याची बिंग फुटून चित्रफित व्हायरल झाल्याची भणक लागताच, या प्राध्यापकाने धूम ठोकली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक- छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वैजापूर शहरानजीक असलेल्या रोटेगाव परिसरात फार्मसी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात औषधी निर्माणशास्त्राचे पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकविले जातात. याच महाविद्यालयातील एका 55 वर्षीय प्राध्यापकाची वैजापूर शहरातील एका युवकाशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर या बहाद्दराने 'तुला मी फार्मसी महाविद्यालयात प्रवेश देऊन उत्तीर्ण करून देता' असे आमिष दाखवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या कामलीलेची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे प्राध्यापकाच्या प्रतापाचे बिंग फुटले. त्याच्या या 'कर्तृत्वामुळे' महाविद्यालय प्रशासनासह संस्थाचालकास शरमेने मान खाली घालण्याची नामुष्की ओढवली गेली.
प्राध्यापक, शिक्षकांना आजही समाजात आदर व मानाचे स्थान आहे. परंतु या जरठ, वृध्द प्राध्यापकाने युवकासोबत अनैसर्गिक कृत्य करून शिक्षकी पेशाला बट्टा लावून समस्त गुरूजींच्या इज्जतीची लक्तरे वेशीवर टांगली आहे. महाविद्यालय प्रशासन या प्राध्यापकाबाबत काय निर्णय घ्यायचा तो घेईलच. परंतु त्याने आणखी किती युवकांना आमिष दाखवून त्यांच्यासोबत अशा 'लीला' केल्या? हा एक संशोधनाचा विषय आहे. तर सद्या वैजापूर तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.
प्राध्यापकामागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता
दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या चित्रफितीने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान हे प्रकरण पोलिस यंत्रणेपर्यंत गेले आहे. त्यामुळे संस्थाचालकांसह प्राध्यापकामागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. पण आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही अधिकृत कारवाई केली नसून, पोलिसांकडे देखील याबाबत कोणतेही लेखी तक्रार आलेली नाही.
व्हायरल झाल्याने बिंग फुटले...
महाविद्यालयातील एका 55 वर्षीय प्राध्यापकाची वैजापूर शहरातील एका युवकाशी ओळख झाली आणि त्यातून दोघांची मैत्री देखील झाली. दरम्यान ओळख झाल्यानंतर या बहाद्दराने प्राध्यापकाने या तरुणाला फार्मसी महाविद्यालयात प्रवेश देऊन उत्तीर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. तर पुढे आमिष दाखवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. मात्र या घटनेची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे प्राध्यापकाच्या प्रतापाचे बिंग फुटले.
इतर महत्वाच्या बातम्या: