Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहर (Chhatrapati Sambhaji Nagar City) पोलिसांच्या गुन्हे शाखेने महत्वाची कारवाई करत अवैधरीत्या तलवारी घेऊन फिरणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. गेल्यावर्षी शहर पोलिसांनी मोठ्या कारवाई मोठ्याप्रमाणात तलवारी पकडल्या होत्या. आता पुन्हा एकदा शहर पोलिसांकडून अवैधरीत्या तलवारी बाळगणाऱ्या लोकांवर कारवाई होताना पाहायला मिळत आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने वाळुज भागातून एकाला आणि लेबर कॉलनी येथून एकाला असे दोघांना तलवारीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. सोनाजी बाबुलाल सोनवणे (वय35 वर्षे रा. बाजारतळ वाळुज, रामराई रोड, ता. गंगापुर, छत्रपती संभाजीनगर) आणि अक्षय ऊर्फ काळया पीता राजु हिवाळे (वय 23 वर्ष, रा. विश्वास नगर, मनपा शाळेच्या बाजुला, फाजलपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे या दोन्ही आरोपींचे नावं आहेत. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोउपनि अमोल म्हस्के यांना गोपनीय माहिती मिळाली की, वाळुजच्या रामराई रोडवरील बाजारतळ येथे एक व्यक्ती एका पांढऱ्या रंगाचे प्लास्टीकच्या गोणीत तलवार घेवुन विक्री करण्यासाठी फिरत आहे. गोपनीय बातमी मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने  वाळुजगांव भागात जावुन बाजारतळ परिसरात सापळा लावला. दरम्यान महिती मिळालेला संशयित  व्यक्ती येताच त्यास पथकाने शिताफीने पकडले. तसेच त्याच्याकडून 28 इंच लांबीची तलवार ताब्यात घेण्यात आली. त्याची अधिक चौकशी केली असता सोनाजी बाबुलाल सोनवणे असे त्याचं नाव असल्याचे कळले. तसेच त्यास तलवार घेवुन फिरण्याचे कारणे विचारले असता काही एक समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे या प्रकरणी पोलीस ठाणे वाळुज येथे कलम 4,25 भारतीय हत्यार कायदा सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दुसरी घटना...


दरम्यान पोलिसांनी आणखी एक कारवाई करत तलवार जप्त केली आहे. गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की,  लेबर कॉलनीतील आण्णाभाऊ साठे चौक येथे एक व्यक्ती हातात तलवार घेवुन फिरत असुन, त्यामुळे आजुबाजुच्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यावरुन गुन्हे शाखेच्या पथक लेबर कॉलनी भागात गेले असता एक व्यक्ती त्यांना पाहुन पळुण जावु लागला. त्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करुन लेबर कॉलनीच्या विश्वासनगर येथील पाडलेल्या शासकीय निवासस्थानाचे परिसरातुन शिताफीने पकडले. त्याच्याकडून 28 इंच लांबीच्या तलवार ताब्यात घेण्यात आली. पोलिसांनी अधिक तपास केले असता त्याचे अक्षय ऊर्फ काळया राजु हिवाळे असे नाव असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे त्याने देखील तलवार घेऊन फिरण्याचे कोणतेही कारण दिले नसल्याने त्याच्या विरुध्द पोलीस ठाणे सिटीचौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन्ही आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : दिवसा टाक्या कापडाने झाकलेल्या अन् रात्री बायोडिझेलची विक्री; विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई