Chhatrapati Sambhajinagar News : नागपूर आणि पुण्यातील अपघात प्रकरणानंतर आता छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक खळबळजनक घटना समोर येत आहे. धावत्या कारमध्ये दारु पित (drinking alcohol in a running car) असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील धुळे-सोलापूर महामार्गावर (Solapur Dhule Highway) घडली आहे.  


दारु पिऊन वाहन चालवल्यामुळं अपघात होण्याची शक्यता


धुळे-सोलापूर महामार्गावरील गांधिले फाट्याजवळ चालू कारच्या खिडकीतून बाहेर उभे राहून दारु पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळं सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच दारु पिऊन कार चालवणाऱ्या वाहनचालकाचा पोलीस शोध घेणार कधी? असा सवालही सध्या विचारला जात आहे. दारुड्यांच्या या वागण्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं आता पोलीस कधी कारवाई करणार असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. 


Video : धावत्या कारमध्ये दारु पित असल्याचा व्हिडीओ समोर,


महत्वाच्या बातम्या:


नेमकं चाललंय काय? भरधाव वॅगनार कार थेट फुटपाथवर, ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार; मद्यधुंद चालकासह एका व्यक्तीला नागरिकांचा चोप