Sharad Pawar criticizes BJP : भाजपची भूमिका समाजात तेढ निर्माण करणारी आहे. मोदी सरकारच्या अनेक निर्णयामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. भाजपविरोधात जनमत तयार करणे गरजेचं आहे. भाजपने अनेक राज्यातील सरकार पाडले. केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून सरकार पाडण्यात येत असून, उद्धव ठाकरेंचं सरकार देखील असचं पाडण्यात आले. तर, मणिपूरमधील स्थिती चिंताजनक असून, मोदी सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. मणिपूरमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना विश्वास दिला पाहिजे असेही शरद पवार म्हणाले.
तर कालच्या भाषणात नरेंद्र मोदी मी पुन्हा येईल म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर बोलतांना शरद पवारांनी खोचक टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस देखील मी पुन्हा येईल असे म्हणाले होते. मात्र, ते दुसऱ्याच पदावर आले, असा टोला पवारांनी लगावला.